सोनई कोरोना हॉटस्पॉट जाहीर ; तहसीलदारांचे आदेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनई कोरोना हॉटस्पॉट जाहीर ; तहसीलदारांचे आदेश

सोनई ः वेबटीम     जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नेवासा  तालुक्यातील सोनई येथेही 10 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प...

सोनई ः वेबटीम 
   जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नेवासा  तालुक्यातील सोनई येथेही 10 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेताना सोनई आता 14 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  याप्रकरणी तहसीलदारांनी तसे आदेश काढले असून त्यात सोनई व त्यालगतचा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. सोनई हे कन्टेन्मेंट झोन व या क्षेत्रातील अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, मेडीकल, दवाखाने, सहकारी, नागरी बँका अशा अत्यावश्यक सेवा कोअर एरिया म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. सदरच्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भिती असल्याने सदरचे क्षेत्र प्रतिबंधित करून तेथील नागरीकांचे व वाहनांचे आगमन व प्रस्तानास बंदी घालण्यात आली आहे. तहसीलदारांच्या आदेशान्वये आता सोनईत कडेकोट बंदोबस्त, नागरीकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची जबाबदारी प्रशासनावर, औषधे, किराणा, दूध देखील प्रशासन सशुल्क घेवून पुरविणार, पर्यायी रस्ते बंद करणार, इत्यादी समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत