जिल्ह्यातील 'या' युवानेत्याला कोरोना ; पत्नीही बाधित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील 'या' युवानेत्याला कोरोना ; पत्नीही बाधित

श्रीरामपूर ः वेबटीम  श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे कोरोनातून मुक्त झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता श्रीरामपूर शहरातील एका युवा नेत्याला आ...

श्रीरामपूर ः वेबटीम 
श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे कोरोनातून मुक्त झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता श्रीरामपूर शहरातील एका युवा नेत्याला आज कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले . सदर युवा नेत्याची आणि त्यांच्या पत्नीची कोरोनाची रॅपिड टेस्ट आज शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आली . त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे . सदर युवा नेते हे मुळा - प्रवरा वीज संस्थेचे संचालक असून त्यांच्या पत्नी श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत . गेल्या दोन - तीन दिवसापासून या युवा नेत्याला सर्दी होती .
 काल ताप आल्याने सदर युवा नेत्याची आज शनिवारी सकाळी कोरोनाची रॅपिड टेस्ट घेण्यात आली . या रॅपिड टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर युवा नेत्यास श्रीरामपूर येथील संतलूक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . त्यानंतर सदर युवा नेत्याच्या धर्मपत्नीसही सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांचीही कोरोनाची रॅपिड टेस्ट आज करण्यात आली . सदर टेस्टचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला . त्यामुळे दोघांवरही तातडीने उपचार सुरू करण्यात आले . श्रीरामपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून चिंतेत भर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत