आता Swab घेतल्यापासून सातव्या दिवशीचं सुट्टी; कोरोना रुग्णाबाबत आदेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आता Swab घेतल्यापासून सातव्या दिवशीचं सुट्टी; कोरोना रुग्णाबाबत आदेश

अहमदनगर : वेबटीम  कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला डिशचार्ज देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नियमात आज बदल केला आहे, आता सुधारित नियमा...

अहमदनगर : वेबटीम
 कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला डिशचार्ज देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी नियमात आज बदल केला आहे, आता सुधारित नियमानुसार सौम्य, अति सौम्य बाधित असलेल्या रुग्णाला स्वब घेतल्याच्या दिनांकापासून 7 व्या दिवशी घरी सोडले जाणार आहे. 
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की,  रुग्णास लक्षणे उदभवल्यापासून ते कोरोना अहवाल येईपर्यंत 3-4 दिवस लागतात, असे माझ्या निदर्शनास आले आहे, त्यानुसार सौम्य, अति सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांची दैनंदिन तपासणी करण्यात यावी, या रुग्णांना 5,6,7 व्या दिवशी ताप नसल्यास  घरी सोडण्यात यावे, त्यावेळी पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही, मात्र त्यानंतर 7 दिवस घरी कोरनटाईन होणे गरजेचे आहे, घरी गेल्यानंतर स्वतः च्या तब्बेतीचे निरीक्षण स्वतः करावे, असे नमूद केले आहे, तर कोरोना बाधित moderate and severe या दोन प्रकारातील रुग्णांना परिस्थितीनुसार 10 दिवसानंतर सोडले जाणार आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला घरी उपचार घेता येणार नाही, असे केल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत