उंबरे : वेबटीम सरपंच हा गावाचा आरसा असतो, तो तत्पर असेल तरच गावचा विकास साध्य होतो, उंबरे गावचे सरपंच देखील तत्पर मात्र मध्यंतरी काम करण्...
उंबरे : वेबटीम सरपंच हा गावाचा आरसा असतो, तो तत्पर असेल तरच गावचा विकास साध्य होतो, उंबरे गावचे सरपंच देखील तत्पर मात्र मध्यंतरी काम करण्यात अडचणी येत असल्याने ते शांत होते, मात्र त्यांनीं आता सर्व बंधने झुगारून गावच्या विकासाला चालना दिल्याने त्यांचे गावातून मोठे कौतुक होत आहे.

उंबरे गाव तस एक आदर्श गाव, मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण होत असल्याने काम करण्यात नेहमीच अडचणी येत असतात, मात्र त्यातून मार्ग काढण्याचे काम सरपंच राजेंद्र अण्णासाहेब ढोकणे यांनी केले आहे. सरपंचांनी दाखवलेल्या तत्परतेने गेल्या अनेक वर्षांपासून गावात सुरू असलेले वाद आता मिटताना दिसत आहे. बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसत होते, त्यामुळे येथे दरवर्षी वाद देखील नित्याचेच होते, आजही येथे किरकोळ तणाव झाला होता, मात्र सरपंच लगेचच धावून आल्याने वाद शमला. सरपंचांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते कैलास अडसुरे, बबनराव ढोकणे, गोरक्षनाथ ढोकणे, नाना खंडू ढोकणे, गणेश तोडमल, देवराम गर्जे, विष्णू भापकर, आदी ग्रामस्थांशी चर्चा करून जेसीबी बोलावून घेत साईडगटार तयार केले, त्यातून हे पाणी गावाबाहेर निघणार असल्याने हा वाद देखील संपला आहे, त्याचबरोबर गावातील जुने बसस्थानक परिसरातही हीच अवस्था आहे, तेथे देखील सरपंचांनी जेसीबी पाठवून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले आहे, शक्य आहे तेथे सोमवारी मुरूम टाकला जाणार आहे , त्यामुळे सरपंचांनी ठरवलं तर एकाच दिवसात देखील मोठे पप्रश्न मार्गी लागले जाऊ शकतात, हेच त्यांनी आज दाखवून दिले आहे. त्यामुळे सरपंच ढोकणे त्यांचे गावातून कौतुक सुरू आहे.
Ekch number
उत्तर द्याहटवा