अहमदनगर : वेबटीम दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणात दोन दिवसांपासून सुरू असलेली आवक आज मंदावली आहे, आज सायंकाळी 6 वाज...
अहमदनगर : वेबटीम
दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणात दोन दिवसांपासून सुरू असलेली आवक आज मंदावली आहे, आज सायंकाळी 6 वाजता धरणात 14,100 दलघफु पाणीसाठा होता, उद्या धरण 55 टक्के भरणार आहे. मुळा धरणाची क्षमता 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दलघफु इतकी आहे, गेल्या वर्षी धरणात चांगले पाणी जमा झाल्याने दुष्काळ जाणवला नाही, त्यामुळे या वर्षीही शेतकऱ्यांचे धरणाकडे लक्ष आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पाणलोटात चांगला पाऊस झाल्याने धरणात मोठी आवक सुरू होती, मात्र वरती पाऊस कमी झाल्याने आवक देखील कमी झाली आहे, आज 1500 कुसेक्सने धरणात आवक सुरू होती, तर पाणीसाठा 14 हजार दलघफु इतका झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत