राहुरी : वेबटीम कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस...
राहुरी : वेबटीम
कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस्त महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुरी बाजार समिती समोर काल शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ‘शिवसेना स्टाईल ने जाळुन’ निषेध व्यक्त करण्यात आला.बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप करीतसे सेनेने कर्नाटक सरकारचा निषेध केला.कर्नाटक सरकारने छत्रपतींच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात तालुका प्रमुख प्रमुुुख विजय ढोकणे,तालुका उपप्रमुख कैलास अडसुरे, गिताराम ढोकणे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत