मुंबई : वेबटीम आ पल्याला अनेकदा एखाद्या मित्राचा मजेशीर व्हॉट्सएप स्टेटस आवडतो. मग आपण 'मला फॉरवर्ड कर' अशी त्याला विनंती करतो...
- मुंबई : वेबटीम आपल्याला अनेकदा एखाद्या मित्राचा मजेशीर व्हॉट्सएप स्टेटस आवडतो. मग आपण 'मला फॉरवर्ड कर' अशी त्याला विनंती करतो. पण आता तसं करण्याची गरज नाहीय. कारण व्हॉट्सएपसध्या स्वत:मध्ये वेगाने बदल करतंय. व्हॉट्सएपचा स्टेटस फिचर लोकांना खूप आवडतंय.
एखादे स्टेटस आवडले तर आपणही ठेवण्यासाठी आग्रही असतो, मात्र विनंती करूनही समोरचा ते फॉरओर्ड करत नाही, त्यामुळे ते आपण अगदी चोरून अर्थात कुणाला न विचारता त्याच्या स्टेटसवर प्रयोग करणे म्हणजे चोरीच, असो काहीतरी खटपटी करून आपण ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो, मात्र आता हे अधिक सोपे झाले आहे, तुम्ही मित्राचे स्टेटस लावले तर कदाचित काहीजण हे माझे स्टेटस चोरल्याचे म्हणतील, मात्र वास्तवात ही चोरी अधिक सोपी झाल्याचे आज आपण पाहणार आहोत
तुमच्या मित्रांचा स्टेटस डाऊनलोड करुन असा सेव्ह करा. यासाठी तुम्हाला व्हॉट्सएप ओपन कराव लागेल. जिथे तुमच्या मित्राचा स्टेटस आहे, तो उघडा.तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये जाव लागेल. तिथे असलेल्या इंटर्नल स्टोरेजवर टॅप करा. इथे तुम्हाला व्हॉट्सएपवर सिलेक्ट कराव लागेल. त्यानंतर मीडिया (Media) ऑप्शनवर क्लीक करा.यात तुम्ही थोड स्क्रोल केलं की तुम्हा स्टेटसच ऑप्शन मिळेल.त्यानंतर तुमच्या सर्व मित्रांचे स्टेटस तुम्हाला समोर दिसतील. तुमच्यामित्राने स्टेट्सला ठेवलेला फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास तो तुम्ही तुमच्या स्टोरीला ठेवू शकता. किंवा गॅलरीत सेव्ह करु शकता.
नव्या रिपोर्टनुसार व्हॉट्सएपमध्ये एंड्रॉइड बीटा टेस्टरसाठी एडव्हान्स सर्च मोड सेवा सुरु झालीय. यामुळे ए व्हॉट्सएप मल्टी डिव्हाइस सेवा सुरु होण्यावर काम सुरु आहे.
PIP मोड म्हणजे काय ?
इंस्टंट मॅसेजिंग एप व्हाट्सएप युजर्सना गेले काही दिवस एक अडचण सतावतेय. यामध्ये पिक्चर इन पिक्चर (PIP) या ऑप्शनचा वापर करता येत नाहीय. WABetaInfo ने यासंदर्भात ट्वीट करत माहिती समोर आणलीय. व्हॉट्सएपमध्ये युट्यूब प्रीव्ह्यू दिसण्यास अडचण येतेय. चॅटमध्ये युट्यूब व्हिडीओ PIP मोडच्या माध्यमातून पाहता येत नाहीय.
WABetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार व्हाट्सएपच्या एंड्रॉईड, आयओएस आणि वेब डेस्कटॉपवर ही अडचण येतेयं. युट्यूबकडून यामध्ये बदल केला जातोय. हे फिचर दिसण्यासाठी व्हॉट्सएप अपडेट करण्याची गरज आहे.
PIP मोडच्या माध्यमातून चॅटमध्ये कोणतीही लिंक पाहीली जाऊ शकते. पण आता जर आलेल्या युट्यूब लिंकवर क्लिक केलं तर चॅट व्हिडीओ प्ले होत नाहीय.
जर तुमच्याकडे व्हॉट्सएप चॅटमध्ये कोणता व्हिडीओ आला तर त्यातून बाहेर न पडता तुम्ही तो पाहू शकता. यासाठी तुम्हाला चॅटमधून बाहेर जाण्याची गरज नसते.
व्हॉट्सएपने नुकतंच क्यूआर कोड हे नवं फिचर लॉंच केलंय. यामुळे व्हॉट्सएप नंबर सेव्ह करण्याची पद्धत बदलली आहे. क्यूआर कोड स्कॅन करुन त्यांच्या लिस्टमध्ये नंबर सेव्ह करणं सोपं झालंय. एंड्रॉइड आणि आयओएस युझर्स देखील सेटींग्जमध्ये जाऊन आपल्या नावासमोर स्वत:च्या कस्टम क्यूआर पाहू शकतात

कोणत्याही टिप्पण्या नाहीत