भागवत धर्म परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी हभप आदिनाथ महाराज दुशिंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भागवत धर्म परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी हभप आदिनाथ महाराज दुशिंग

 राहुरी : वेबटीम गेल्या पाच वर्षांपासून हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण राज्य पादांक्रात करण्याची मनिषा बाळगणारे हिंदुधर्म प...

 राहुरी : वेबटीम

गेल्या पाच वर्षांपासून हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण राज्य पादांक्रात करण्याची मनिषा बाळगणारे हिंदुधर्म प्रचारक तथा राहुरी तालुक्याचे भूषण हभप आदिनाथ महाराज उंबरेकर यांची नुकतीच राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने भागवत अर्थात वारकरी संप्रदाय कात टाकणार हे निश्चित.   
 
 उंबरे जन्मगाव असलेले आदिनाथ महाराज यांना बालपणापासून हरिनामाची गोडी, एकीकडे शिक्षण सुरू असताना दुसरीकडे रामनामात मन गुंतले. त्यामुळे पेन आणि टाळ ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी महाराजांच्या हातात पडल्या. नेहमी चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिल्याने अगदी कमी वयात त्यांच्या विचारांची उंची वाढली. कीर्तन, प्रवचन, व्याख्याने यातून त्यांनी बोध घेतला. मनुष्य जीवनाचा अर्थ त्यांनी जाणून घेत त्या दिशेने वाटचाल सुरू केली, उच्च शिक्षण अर्ध्यावर सोडून महाराजांनी आपला जन्म हा हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी घालवायचा, हे मनोमन ठरवून टाकले. गावचे दैवत वै हभप रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या प्रेरणेतून व वै हभप पंढरीनाथ महाराज उंबरेकर, हभप लक्ष्मण महाराज उंबरेकर, हभप जनार्धन महाराज उंबरेकर यांनी घालून दिलेल्या आदर्शावरून त्यांनी वाटचाल सुरू केली, गावातीलहभप बाळासाहेब महाराज डेंगळे, हभप गोरक्षनाथ महाराज, हभप मच्छिन्द्र महाराज यांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत गेले, कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार, ग्रामस्थांनी त्यांना प्रोत्साहन दिले, त्यामुळे आदिनाथ महाराज आळंदीकडे धार्मिक शिक्षणासाठी रवाना झाले.
शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग तयार केला, त्यात कीर्तन व प्रवचनांतून जनतेचे फकत कान फुंकून जमणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात जनतेत जागृती कशी होईल, यासाठी त्यांनी काम सुरू केले, आपल्या देशात वाढत्या अत्याचाराच्या घटना, स्त्रीभ्रूण हत्या, गोवंश जनावरांची कत्तल, असुरक्षित मंदिरे, धर्माच्या नावाखालचा पाखंडीपना, बेरोजगारी त्याचबरोबर हिंदू संस्कार, रूढी, परंपरा व त्यातील सुसंस्कृत पणा किर्तनांतून त्यांनी नेहमी श्रोत्यांच्या मनात जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदिनाथ महाराजांवर पगडा असल्याने त्यांना तरुणांची ताकद समजली होती, आजचा तरुण हा उद्याचे देशाचे भवितव्य आहे, हेच ओळखून महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जेष्ठ लोकांपेक्षा तरुणांवर लक्ष केंदित केले आहे, त्यातून हिंदू धर्माचे हे संस्कार बालपणीच घडावे, यासाठी त्यांनी गुरुकुल सुरू केले, त्यात अध्यात्मिक व भौतिक शिक्षणही त्यांनी सुरू केले आहे. शेकडो विद्यार्थी घडविण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची भागवत धर्म परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एकनाथ महाराज सदगीर यांनी अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.  आदिनाथ महाराजांकडे कुशल प्रभुत्व आहे, उत्तुंग विचार आहेत, प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ते आपल्या किर्तनांतून हिंदू धर्माची कीर्ती कोसो किलोमोटर पोहचणार आहे व त्यातून कोट्यावधी श्रोते निर्माण होऊन अनेक कर्तृत्वाने धर्म रक्षक निर्माण होतील, याची उंबरेकराना खात्री आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत