मुंबई : वेबटीम एड्सग्रस्त (एचआयव्ही पॉझिटीव्ह) व्यक्तींसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यानेच एचआयव्हीग्रस्त मुलीवर ब...
मुंबई : वेबटीम
एड्सग्रस्त (एचआयव्ही पॉझिटीव्ह) व्यक्तींसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यानेच एचआयव्हीग्रस्त मुलीवर बलात्कार केला. बालाजीनगर येथे ही धक्कादायक घटना घडली. याबाबत एका समाजसेवकाने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
धनकवडी येथे लाइफ प्रोसेस हेल्प फाउंडेशन नावाची संस्था आहे. संबधित आरोपी या संस्थेवर पदाधिकारी असून, ही संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या लोकांसाठी समाजकार्य करते. संबधित संस्थेमध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलीला मार्च महिन्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही मुलगी संस्थेत उपचार घेत असताना आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एका समाजसेवकाने याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदने या करत आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत