राहुरी : वेबतीम नगर दक्षिण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सकाळी 1850 कुसेकने आवक सुरू होती तर धरणात 47 टक्के मजणजेच12,100 दलघफु ...
राहुरी : वेबतीम
नगर दक्षिण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सकाळी 1850 कुसेकने आवक सुरू होती तर धरणात 47 टक्के मजणजेच12,100 दलघफु पाणीसाठा झाला होता.
राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी या चार तालुक्यासह नगर, एमआयडीसी, देवळाली, राहुरी नगरपरीषद तसेच अन्य पाणी योजनांना मुळा धरण एक वरदान ठरलेले आहे. पावसाळ्यात मुळा धरण भरले तरच शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन होते, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत नाही, त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच यंदाही लाभक्षेत्रातील जनतेच्या मुळा धरणाकडे नजरा आहेत. मात्र अजून पाणलोटात पाऊस नसल्याने धरणात होणारी आवक कमीच आहे, त्यामुळे धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत आज अखेर 3000 दलघफु अर्थात 3 टीएमसी पाणी कमी उपलब्ध आहे. आज सकाळी धरणात12,100 दलघ फु पाणी जमा झाले होते तर आवक वाढत असल्याचे समाधानकारक चिट आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत