चीनला 4 हजार कोटींचा दणका ; महिला भगिनींनी स्वदेशी राख्या केल्या खरेदी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चीनला 4 हजार कोटींचा दणका ; महिला भगिनींनी स्वदेशी राख्या केल्या खरेदी

दिल्ली : वेबटीम      भारताला नेहमी त्रास देणाऱ्या चीनला भारत वासीयांनी धडा शिकविण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे, यात आपल्या देशातील ...

दिल्ली : वेबटीम     
भारताला नेहमी त्रास देणाऱ्या चीनला भारत वासीयांनी धडा शिकविण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे, यात आपल्या देशातील 'बहिणींनी' यंदाच्या रक्षाबंधनला  चीनला जबर झटका दिला आहे. रक्षाबंधनाला चीनचा भारतातील होणारा ४ हजार कोटींचा राखी व्यवहार महिला भगिनींनी तोडला आहे.
 
यंदा राखीचा सण 'हिंदुस्थानी राखी' च्या स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठे यश आले आहे.यंदा चीनमधून राखी किंवा राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य चीनमधून अजिबात आयात करण्यात आलेले नाही. या मोहिमेचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय वस्तूंद्वारे सुमारे १ कोटी राख्या या घरातून काम करणारे आणि अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांसह इतर कष्टकरी हातांनी बनवल्या आहेत. वेगवेगळ्या आणि अतिशय आकर्षक राख्या त्यांनी बनवल्या आहेत. त्याचवेळी भारतीय राखी उत्पादकांनी भारतीय वस्तूंमधूनही राखी बनविली आणि देशभरात या राख्यांना चांगलीच मागणी आहे.
दरवर्षी ५० कोटी राख्यांच्या व्यापार
देशात दरवर्षी सुमारे ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो. ज्याची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधून राखी किंवा राखीसाठी लागणारे साहित्य आयत होते. हा राखीचा माल सुमारे ४ हजार कोटींचा होता. हा माल यंदा भारतात आयात झालेला नाही, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.
कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गेलेच नाहीत. तर काहींनी ऑनलाइन राख्या खरेदी केल्या आहेत. मौली किंवा कलावापासून घरच्या घरी तयार केलेली राखी आपल्या भावाच्या हातावर बांधावी. ही राखी वैदिक बनेल. त्याला रक्षा सूत्र असेही म्हणतात. ही राखी सर्वात शुद्ध आणि पवित्र आहे. पूर्वीच्या काळी अशाच प्रकारे राखी तयार केली जात होती, असं कॅटने म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत