ओळखल का? हे आहेत राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओळखल का? हे आहेत राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख !

 राहुरी : रफिक शेख    तहसीलदार म्हटलं की मस्त केबिन मध्ये बसलेला अधिकारी अशी आपली धारणा असते किंबहुना आपला अनुभव ही असतो.मात्र ज्यांची...


 राहुरी : रफिक शेख 
 तहसीलदार म्हटलं की मस्त केबिन मध्ये बसलेला अधिकारी अशी आपली धारणा असते किंबहुना आपला अनुभव ही असतो.मात्र ज्यांची" सुरवात "इमानदारी, स्वकष्ट आणि शून्या" पासून होते. त्यांना  "हारण्याची, घाबरण्याची, ओळख" निर्माण करण्याची "गरज" आणि "भीती" नसते.आणि अशा व्यक्तीचे पाय नेहमी जमिनीला असतात,त्यांचे अंगात कधी फुगीरी घुसत नाही. हे सर्व गुण  राहुरीच्या तहसीलदारांकडे दिसून येतात.    
 अत्यंत सामान्य कुटुंबातील असणारे एफ.आर.शेख राहुरीच्या तहसीलदार पदी विराजमान झाल्यापासून लोकसभा,विधानसभा निवडणुका सह अनेक कामात त्यांनी आपली कौशल्य दाखवले.सध्या सुरू असलेल्या कॊरोना संकटात तालुक्यातील जनतेला विश्वास निर्माण करून जनतेला कोरणापासून दूर ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.
कॊरोना शी लढतांनाच जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.
राहुरीच्या शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणताही बडेजाव न करता चक्क  शेताच्या बांधावर बस्तान मांडून शेतकऱ्यांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवणाऱ्या या आगळ्या वेगळ्या अधिकाऱ्याला मनापासून सलाम!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत