तिघांनी गळा दाबून केला एकाचा खून ; वाचा अधिक माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तिघांनी गळा दाबून केला एकाचा खून ; वाचा अधिक माहिती

संगमनेर ः वेबटीम   उसनवारीने दिलेल्या पैशांवरून एकाचा तीघांनी गळा दाबून निर्घून खून करत मृतदेह निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात फेकून देवून...

संगमनेर ः वेबटीम
  उसनवारीने दिलेल्या पैशांवरून एकाचा तीघांनी गळा दाबून निर्घून खून करत मृतदेह निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात फेकून देवून पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील  गोडसेवाडीत घडली आहे.

निळवंडे उजव्या कालव्याच्या बोगद्याजवळ साचलेल्या पाण्यात एका 66 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिस  निरीक्षक  सुनील पाटील, सहाय्यक फौजदार बाळासाहेब घोडे, पोलीस नाईक महेंद्र सहाणे यांनी तात्काळ घटना स्थळी जावून पंचनामा केला आणि त्या तरुणाचा मृतदेह  शवविच्छेदन गृहात ओळख पटविण्यासाठी पाठविण्यात आला.मृतदेह आणि चेहरा पुर्णपणे काळा पडल्यामुळे त्याची ओळख पटणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी सोशल मिडीयाचा वापर केला असता मृत इसमाची ओळख पटली. तो जवळच्या गोडसेेेवाडी येथील रामदास येरमल होता. त्यानंतर तपासाला वेग दिला असता     हा वाद केवळ उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या प्रकरणावरून झाला असल्याच्या समोर आले. याप्रकरणी मयत रामदास येरमल याची पत्नी अनिता येरमल  हिने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोकुळ भाऊसाहेब शिरतार,भाऊसाहेब राणु शिरतार व रमेश खंडू म्हस्कुले रा. गोडसेवाडी, या तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली . आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत