मुंबई ः वेबटीम अभिनेता सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप दरम्यान सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. याप्रकरणाला रा...
मुंबई ः वेबटीम
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून हा इशारा दिला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे न्यायला पाहिजे. पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करून काही तरी लपवण्याची काही लोकांना दुर्बुद्धी सूचली आहे. देव त्यांना सुबुद्धी देवो, असं सांगतानाच एखाद्या प्रकरणावरून कोणतंही सरकार अस्थिर होत नसतं. अशी सरकारे अस्थिर व्हायला लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील प्रश्न सुटावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री मोदींच्या पाठी आहेत. त्यामुळे राजकारण न करता हा देश पुढे जावा, अशी आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप दरम्यान सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. याप्रकरणाला राजकीय वळण दिलं जात असल्याने शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. एखाद्या प्रकरणामुळे सरकार अस्थिर व्हायला लागले तर सर्वात आधी केंद्रातील सरकार पडेल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. राज्यातील आघाडी सरकार मजबूत आणि स्थिर असून महाराष्ट्रात ऑपरेशन कमळच काय? कोणतंही ऑपरेशन यशस्वी होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून हा इशारा दिला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे न्यायला पाहिजे. पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करून काही तरी लपवण्याची काही लोकांना दुर्बुद्धी सूचली आहे. देव त्यांना सुबुद्धी देवो, असं सांगतानाच एखाद्या प्रकरणावरून कोणतंही सरकार अस्थिर होत नसतं. अशी सरकारे अस्थिर व्हायला लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील प्रश्न सुटावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री मोदींच्या पाठी आहेत. त्यामुळे राजकारण न करता हा देश पुढे जावा, अशी आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत