कोपरगाव(वेबटीम) रब्बी हंगामाची पूर्व तयारी म्हणून वीज वितरण कंपनीने सर्व ट्रान्सफार्मर दुरुस्त करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रद...
कोपरगाव(वेबटीम)
रब्बी हंगामाची पूर्व तयारी म्हणून वीज वितरण कंपनीने सर्व ट्रान्सफार्मर दुरुस्त करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की , यावर्षी गेल्या सहा महिन्या पासून सर्वत्र चांगला पाऊस पडलेला आहे. त्यापूर्वी उन्हाळ्यात सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पिके काढलेली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पाण्याचे पंप बंद होते. मात्र आता शेतकरी रब्बी हंगामाची लगबग सुरू झालेली आहे ,असे असताना शेतकरी आता लाल कांद्याची लागण, व उन्हाळ कांद्याच्या रोपांची लागवड करत आहे .तर अनेक शेतकरी गहू पिकांची पेरणी करत आहे त्यामुळे बरेच शेतकरी आपले विद्युत पंप सुरू करत असून अचानक बऱ्याच दिवसापासून वीज मागणीत वाढ होणार आहे.
मात्र ,गेल्या पाच सहा महिन्या पासून वीज मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना तेवढी विजेची तेवढी आवश्यकता जाणवली नाही. आता रब्बीच्या पिकांची लागवड व पेरणी सुरू झाल्याने विजेची मागणी वाढणार आहे .अनेक ट्रान्सफार्मर च्या वायर जळालेल्या आहे तर अनेक ठिकाणी फ्यूज गायब झालेल्या आहे बरेच ट्रान्सफार्मर मधून ऑइल गळती झाली असून वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
शेतकरी आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असताना मोठा खर्च करून उन्हाळा कांद्याचे रोप तयार करत आहेत मात्र विज वितरण कंपनी कधीच स्वतःहोऊन ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत नाही वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे.
मागील काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यात २००च्या वर ट्रान्सफार्मर बदलून दिल्याचे वीज वितरण कंपनीने प्रसिद्ध केले मात्र हे ट्रान्सफार्मर पुन्हा कार्यन्वित करण्यासाठी शेतकऱ्यांना किती हाल सहन करावे लागले हे पाहणे देखील गरजेचे आहे. शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी मागणी केल्या नंतर नादुरुस्त ट्रान्स फार्मर दोन दिवसात दुरुस्त करून घ्यावा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकारी अर्थपूर्ण तडजोडी शिवाय ट्रान्स फार्मर बसवून देत नाही त्या तडजोडी करून देखील ट्रान्सफार्मर बसविण्यास शेतकऱ्यांना अनेक चकरा माराव्या लागतात .
रब्बी हंगामातील पूर्व तयारी म्हणून वीज वितरण कंपनीने सर्व ट्रान्स फार्मर च्या फ्यूज, वायर व ऑइल बदलून द्यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे या पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत