अकोले (प्रतिनिधी) अगस्ती सहकारी कारखाना कारखाना कार्य स्थळी दीपावली निमित्ताने आज लक्ष्मी पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. अकोले तालुक्याच...
अकोले (प्रतिनिधी)
अगस्ती सहकारी कारखाना कारखाना कार्य स्थळी दीपावली निमित्ताने आज लक्ष्मी पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीच्या गळीत हंगाम सुरू होऊन २0 दिवस झाले आहेत. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असून नगर जिल्ह्यात सध्या अगस्ती सहकारी साखर कारखाना सर्वांच्या पुढे आहे.
दीपावली सणानिमित्त आज कारखाना संस्थापक चेअरमन माजी मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन तथा अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम पा.गायकर,संचालक तथा माजी आमदार वैभवराव पिचड व सर्व संचालक,कार्यकारी संचालक भास्करराव घुले,सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी,कामगार यांच्या उपस्थितीत दीपावली निमित्ताने लक्ष्मी पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्तीचे गळीत हंगाम यशस्वीरित्या चालू असून कार्यकारी संचालक भास्करराव घुले,सर्व विभाग प्रमुख,कर्मचारी व कामगार हे या गळीतावर लक्ष ठेवून आहेत.पूर्ण क्षमतेने चालू असलेल्या अगस्तीच्या गळीताचा २0 वा दिवस असून आज पर्यंत(दि.13 नोव्हेंबर)गळीत मे. टन ७७0८९ मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.तर आज साखर पोते ३५९0 क्विंटल उत्पादन झाले असून आज अखेर ५९१00 मे.टन साखर उत्पादन झाले आहे.आजचा साखर उतारा ८.८३% असूनआज अखेर ८.0३ % इतका आहे
कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असल्याने त्याचा फायदा इथेनॉल निर्मितीसाठी होणार आहे.पर्यायाने ऊस उत्पादक,सभासद यांना त्याचा लाभ होईल.यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दीपावलीसाठी सभासदांना चांगले पैसे मिळाल्याने बाजारपेठही फुलली आहे.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर चेअरमन माजीमंत्री मधुकरराव पिचड,व्हा.चेअरमन सीताराम पा गायकर व संचालक माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यातील जनतेस,सभासदांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत