कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील गोदावरी मातेचे सेवक सामाजिक कार्यकर्ते गोदामाई प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या वतीने गोदात...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरातील गोदावरी मातेचे सेवक सामाजिक कार्यकर्ते गोदामाई प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या वतीने गोदातीरावर बसलेले अनाथ नदीची वाळू राख चाळून त्यातून मिळणाऱ्या कवडीमोल पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिला पुरुषांना व लहान मुलांना दिवाळी सणानिमित्त लक्ष्मी पूजन च्या दिवशी लाडू शेव चिवडा या स्वरूपात फराळाचे वाटप करून या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने हसू फुलविले.
तसेच गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने दर शनिवारी गोदावरी घाटाची स्वछता मोहीम राबविली जाते आज त्या मोहिमेचा ८९ वा आठवडा होता सर्व गोदा सेवक आपले कार्य करत असताना त्यांना काट्यात अडकलेल्या माशाचा जाळ्यात दोन साप अडकलेले दिसले ढाकणे व सर्व गोदा सेवकांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता या सापांना त्या जाळ्यातून सुटका करत नदी मध्ये सोडून दिले.त्यांचा या कार्याची सर्वत्र चर्चा होत असून सर्व सदस्यांन वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत