जामखेड(वेबटीम) शहरातील साठे नगर येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर...
जामखेड(वेबटीम)
शहरातील साठे नगर येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मातंग समाजात जन्मलेले लहुजी वस्ताद शूरवीर पराक्रमी म्हणून त्यांची ख्याती होती त्यांचा समाजाने आदर्श घ्यावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, साठे नगरचे अध्यक्ष किशोर कांबळे, नगरसेवक अर्शद शेख,काँग्रेस चे नेते जमीर सय्यद,समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे,वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अतिश पारवे,आरपीआयचे ता.अध्यक्ष बाबा सोनववणे,युवा नेते नितीन हुलगुंडे, रत्नाकर सदाफुले,अतिश डाडर,रवी डाडर,दादा डाडर,मनीष घायतडक, अक्षय गायकवाड, प्रतिक निकाळजे,विनोद कांबळे ,बाबु डाडर,किरण सदाफुले सह आदी मातंग समाज व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत