राहूरी फॅक्टरी(वेबटीम) नगर मनमाड मार्गावर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत पावलेल्या राहूरी तालुक्यातील गणेगाव येथील रमेश ...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
नगर मनमाड मार्गावर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत पावलेल्या राहूरी तालुक्यातील गणेगाव येथील रमेश कोबरने यांच्या कुटुंबीयास दि १५ नोव्हेंबर रोजी नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.
गणेगाव येथील महिन्यात रमेश कोबरने यांचा देहरे येथे ट्रकखाली सापडून अपघातात जागेवर मृत्य झाला होता .कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने ही मदत सुपूर्त केली मयत कोबरने यांच्या लहान मुलांकडे व वडिलांकडे सुपूर्त केली.
दरम्यान यावेळी समाजातील इतर दानशूर मंडळींनी सदर कुटुंबास मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन समितीने केले आहे.यावेळी वसंत कदम, देवेंद्र लांबे, अनिल येवले, शिवचरित्रकार हसन सय्यद,ज्ञानेश्वर मोरे, सुधाकर आदिक, सचिन तारडे,अरुण निमसे,अविनाश क्षीरसागर, नितीन मोरे, सुयोग सिनारे, रोहित वाकचौरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत