कोपरगाव(अक्षय काळे) गेल्या पन्नास वर्षापासून राहाता,कोपरगाव मतदार संघाची अविरत सत्ता भोगणाऱ्या नेत्यांना पाणी व रस्त्याच्या समस्या सोडविण्...
कोपरगाव(अक्षय काळे)
गेल्या पन्नास वर्षापासून राहाता,कोपरगाव मतदार संघाची अविरत सत्ता भोगणाऱ्या नेत्यांना पाणी व रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी छगन भुजबळ यांना साकडे घालावे लागले. म्हणजेच दोन्ही तालुक्यातील यांनी आपला नाकर्तेपणा वर शिक्कामोर्तब केला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या पाणी नियोजन बैठकीचे आयोजन कोपरगाव व राहता तालुक्यात करण्यात आले होते . या दोन्ही बैठकीमध्ये कोपरगाव तालुक्यातील विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. तर राहाता येथील बैठकीत देखील राधाकृष्ण विखे यांनी हीच मागणी केली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सात आवर्तने मिळावी अशी मागणी केली.
कोपरगाव व राहता तालुक्यातील सत्ता गेल्या पन्नास वर्षांपासून काळे- कोल्हे व विखे कुटुंबात आहे. या तिन्ही कुटुंबांना राज्यात व देशाच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे. तसेच साखर कारखाने, जिल्हा बँका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ता यांच्याच ताब्यात आहेत.
या तिन्ही कुटुंब पश्चिमेला समुद्रात जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवावे म्हणून मागणी करत आहे. मात्र एके काळी सुजलाम सुफलाम असलेले गोदावरी खोरे आता उजाड झाले असून अनेक सधन शेतकरी पाण्याच्या नियोजना अभावी देशोधडीला लागले आहेत. याउलट या एकाच आश्वासनावर या घराण्यातील तिसरी पिढी सत्ता उपभोगत आहेत असे असताना या राजकीय नेत्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला वळवावे म्हणून आता पर्यंत कोणता आराखडा शासनाला दिला ? त्यावर कोणती कारवाई झाली, निळवंडे धरण व त्याचे काम कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे
याउलट गेल्या पंधरा वर्षांपूर्वी येवला मतदार संघात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मतदार संघाच्या विकासात पाणी व रस्त्याच्या निर्मितीचे राज्याला दिशादर्शक असे आदर्श मॉडेल उभे केले मांजर पाडाचे पाणी मतदार संघात आणण्याचे स्वप्न साकार केले .
मात्र पन्नास वर्षात कोपरगाव व राहता तालुक्यातील नेत्यांनी केवळ आश्वासने व भूलथापा देऊन तालुक्यातील जनतेची एक तर दिशाभूल केली किंवा आपण हे सर्व प्रश्न सोडवण्यास अकार्यक्षम आहोत हे शिक्कामोर्तब केले.
गेल्या तीन महिन्यापासून गोदावरी नदी दुथडी वहात असून सर्वच धरणे १००% भरलेले आहेत असे असताना कोपरगाव व राहता तालुक्यात कालवा कृती समितीच्या बैठका घेऊन ही शेतकऱ्यांना पाच सात पाण्याची आवर्तने मिळतील अशी अपेक्षा असताना तीन आवर्तनाचे आश्वासन पदरी पाडण्यात समाधान मानावे लागले. तर या दिगग्ज नेत्यांना पन्नास वर्षे सत्ता मिळून व मंत्री पदे मिळून देखील पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवावे या करिता छगन भुजबळ यांना साकडे घालावे लागणे म्हणजे या राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणा वर शिक्कामोर्तब केला असून जनतेचे रस्ते,पाणी या मूलभूत समस्या सुटत नसतील तर नऊते भुजबळांना साकडे घालण्यापेक्षा तालुक्याचे नेतृत्व भुजबळासारख्या खमक्या नेत्याच्या हातात द्यावा अशी जनतेत चर्चा सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत