कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा व कोपरगाव त...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा व कोपरगाव तालुका,बाल रंगभूमी परिषद, फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त 'घर तेथे रांगोळी' स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात सोमवार दि.१६ नोव्हेंबर २०२० रोजी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत अॉनलाईन पध्दतीने केल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले आहे. प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच २५ विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी अग्रवाल चहा,बोरा कलेक्शन,तुलसीदास खुबाणी ज्वेलर्स,खुबाणी व्हेंचर्स,विसपुते सराफ,साई आर्टस् ,नगर अर्बन को-आँप.बँक लि.,शिरोडे किडस्प्लॅनेट,कापसे पैठणी,एस.के.सर्व्हिसेस,भारत प्रेस, सुशांत आर्टस अॅन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी नसून नाव नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेसाठी विशिष्ठ नियम व अटी तयार केल्या असून नाव नोंदणीच्या ठिकाणी सदरचे माहितीपत्रक उपलब्ध केले आहे, स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी नियम व अटीचे वाचन आणि पालन करणे आवश्यक असून ते स्पर्धकाला बंधनकारक राहतील.नाव नोंदणीसाठी दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर नाव नोंदणी कळवावी स्पर्धकाचे पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर कळवावा. त्यानुसार नोंद घेऊन स्पर्धकाला स्पर्धेत क्रमांक नावनोंदणी अधिकारी कळवतील.स्पर्धक कोपरगावातील रहिवासी असावा. कुटुंबातील एका सदस्याला स्पर्धक म्हणून समजण्यात येईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सअप वर पाठवण्यात येईल.स्पर्धकाने त्या प्रमाणपत्राची रंगीत प्रिंट काढून घ्यावी. स्पर्धकांना स्पर्धेच्या दिवशी साकारलेल्या रांगोळीचा नोंदणी क्रमांक टाकलेला फोटो तसेच स्पर्धकांचा रांगोळी सोबत एक स्वतंत्र फोटो नोंदणी अधिकारी यांचे व्हाट्सअप वर तसेच नोंदणी केंद्राच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवावा. स्पर्धेचे परीक्षण स्पर्धेच्या दिवशी सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ०९:३० ते ०२:०० वाजेपर्यंत होईल स्पर्धेचे परीक्षण होईल.या संदर्भात नोंदणी अधिकारी आपणास व्हाट्सअप वर कळवतील.स्पर्धेसंदर्भात सर्व बदल,नियम,अटी,हक्क आयोजकांनी राखून ठेवल्याआहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेकरिता ऑनलाइन नाव नोंदणी ९५६०७५६२७, ९८२२०९९५१९, ७७५७८५५४४२ या क्रमांकावर स्पर्धक आपले नाव नोंदणी करु शकतात.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा.सौ.लताताई भामरे, प्रा.रश्मीताई जोशी,प्रा.सौ.कल्पनाताई गीते,प्रा.मसुदा दारुवाला, अॅड.सौ.सिमाताई जोशी,प्रा.सौ.पल्लवी वदक (रुईकर),प्रा.अनिल अमृतकर,डॉ.नीलिमाताई आव्हाड, प्रा.सौ.पायल देवळालिकर,प्रा.सौ. ज्योतीताई कोताडे,सौ.सुरेखाताई चिंचपुरे, सौ.सुरेखाताई आव्हाड,सौ.सीमाताई भिडे,प्रा.समीना बेग,प्रा.तेजल पगारे,प्रा.माधवी पेटकर,सौ.गीताभाभी बंब,प्रा. दर्शना हलवाई,प्रा.ऐश्वर्या बिडवे, प्रा.वंदना अलई,सौ.मनीषा धनवटे,प्रा.कविता बडोगे,सौ.पल्लवीताई भगत,सौ.कोमलताई गोडसे ,सौ.जयश्री मोराणकर, प्रा.अमोल निर्मळ,प्रा.मानसी टिळेकर,बंडूनाना चिंचपुरे,महेश थोरात,रविंद्र भगत,अॅड.महेश भिडे,प्रा.अतुल कोताडे,प्रा.मतीन दारुवाला, चंद्रकांत चोपडे,दीपक येवले, मिलिंद जोशी, कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य ,कला प्रेमी नागरिक प्रयत्नशील आहेत.घर तेथे रांगोळी स्पर्धेत जातीत जास्त कला प्रेमिंनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत