राहूरी(गोविंद फुणगे) राहुरी खुर्द परीसरात हायप्रोफाईल वेशाव्यवसाय चालवणाया हाॅटेलवर संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून कार...
राहूरी(गोविंद फुणगे)
राहुरी खुर्द परीसरात हायप्रोफाईल वेशाव्यवसाय चालवणाया हाॅटेलवर संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केल्याने अवैध व्यवसायिकांमधे एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून परप्रांतीय बंगाली महिलेची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सुञांकडून देण्यात आलीय.
राहूरी खुर्द येथील न्यू भरत हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाला मिळाल्यानंतर या ठिकाणी डीवायएसपी संदीप मिटके, आयुष्य नेपणी, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या पथकाने एक बनवट ग्राहक पाठवुन छापा टाकला.
येथील मॅनेजर सय्यद फरहाद इर्शाद ऊर्फ दाणीश राहणार राहुरी हा परप्रांतीय महिलेकडून वैश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती या पथकात मिळाली होती सदर आरोपी विरोधात आता राहुरी पोलीस ठाण्यामध्ये प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस सुञांकडून देण्यात आली आहे.
डीवायएसपी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई केली तसंच आता सुरूअसलेल्या या धकड कारवाईने मात्र अवैध व्यवसायिकाची चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत