अकोले(वेबटीम) समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. त्याचा उपयोग करून आपले आरोग...
अकोले(वेबटीम)
समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. त्याचा उपयोग करून आपले आरोग्य चांगले ठेवा तर कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु होत असून आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे .डॉ . राजेंद्र विखे यांनी केलेली मदत मोलाची आहे असे उद्गगार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर येथे आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले .
प.पू. स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्टान व प्रवरा आरोग्य केंद्राच्या सयुंक्त विद्यमाने सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते. आदिवासी व राजूर परिसरातील तीनशे रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली .वृद्धांची संख्या अधिक होती त्यांना मास्क , वाटप करण्यात आले सामाजिक अंतर ठेवून हे शिबीर यशस्वी करण्यात आले .
या प्रसंगी पालघर , ठाणे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . मिलिंद चव्हाण , भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष गिरजाजी जाधव , सरपंच गणपत देशमुख , सभापती सौ उर्मिला राउत , उपसभापती दतात्रय देशमुख प्रतिष्टानच्या अध्यक्षा सौ हेमलताताई पिचड, जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्ष सौ , सोनाली नाईकवाडी , भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, डॉ . सौ . चव्हाण ,उपसरपंच गोकुळ कान काटे प्रवरा रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . मिलिंद चव्हाण म्हणाले, आज युरोप मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग सुरु झाला आहे . मधुमेह व हार्ट अटक रुग्णांनी घरातून शक्यतो बाहेर पडू नका, पडले तर मास्क घालून बाहेर पडा . ते तुमच्या हिताचे असून आरोग्य शिबिराचा सरावाने फायदा घ्या . प्रास्तविक करताना सौ हेमलताताई पिचड म्हणाल्या की, प्रतिष्ठानच्या वतीने आजपर्यंत ५५ आरोग्य शिबिरे आदिवासी भागात घेतले आदिवासी समाज गरीब असून त्याच्या व ज्यांचेकडे आर्थिक कुवत नाही अशा रुग्णांसाठी आमची धडपड असून आज तिनशे रुग्णांनी उपचार करून घेतले त्याचा फायदा इतरांनाही घ्यावा असे आव्हान केले.
डॉ . मिलिंद चव्हाण , व गिरजाजी जाधव यांच्या शुभ हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन झाले तर आभार गोकुळ कानकाटे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत