कोपरगाव येथे मनसेकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे मनसेकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध

कोपरगाव (अक्षय काळे )  जगात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील बहुतांश देश हा लॉकडाउन च्या अवस्थेत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

कोपरगाव (अक्षय काळे)

 जगात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील बहुतांश देश हा लॉकडाउन च्या अवस्थेत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संपूर्ण भारतात लोकडाऊन ची हाक दिली त्याला महाराष्ट्र सरकारने देखील चांगला प्रतिसाद देत कडक अंमलबजावणी करत जीवनावश्यक सोडून सर्व काही बंद केले.  या बंदचा फटका सर्वसामान्य सह मोठं मोठ्या कंपन्यांना देखील बसला यात भरपूर नागरिकांना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या काही कुटूंबावर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली कसा बसा आपला प्रपंच त्यांनी जिवंत ठेवला आणि आता अनलॉक सुरू झाल्यापासून सगळं सुरळीत होईल असे वाटत असतानाच महावितरण ने लोकडाऊन काळात रीडिंग न घेता सरासरी वीज ग्राहकांना वीज बिल दिले ते अनलॉक नंतर कही पटीत देत आव्वा च्या सव्वा वीज बिल पाठवली या विरोधात मनसे ने वेळीवेळी आंदोलन केली कोपरगाव येथे वीज बिलाची होळी देखील केली. 



हाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य भर यावर आवाज उठवला त्यावेळी शासनाच्या वतीने सांगण्यात आले की काही प्रमाणात बिलात सूट किंवा माफी देण्यात येईल त्याविषयी आमच्या उच्चस्तरीय बैठका सुरू आहे या आशेवर संपूर्ण महाराष्ट्रा असतांना राज्याचे ऊर्जा मंत्री ना नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की वीज बिलात कोणत्याही प्रकारे माफी अथवा सूट मिळणार नाही त्यामुळे संबंध महाराष्ट्र मधील जनतेचा भ्रमनिरास झाला असून त्यांचा या वक्तव्याचा व महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आज कोपरगाव येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

   या वेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे, मा.तालुकाध्यक्ष अलिमभाई शहा, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, अनिल गाडे, हिंदु सम्राट संघटना संस्थापक गिताई प्रतिष्ठान सचिव बापु काकडे, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख, वाह शहराध्यक्ष सचिन खैरे, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटीभैय्या सपकाळ, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, उपशहराध्यक्ष संजय जाधव, युवा नेते नवनाथ मोहिते, हिंदु सम्राट अध्यक्ष अतिश शिंदे, उपाध्यक्ष अनिकेत खैरे आदि मनसैनिक उपस्थित होते।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत