जामखेड प्रतिनिधी खर्डा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयाची अज्ञात इसमाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांचे कार्यालयच असुरक्षित तर जनतेची ...
जामखेड प्रतिनिधी
खर्डा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयाची अज्ञात इसमाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांचे कार्यालयच असुरक्षित तर जनतेची काय सुरक्षा रहाणार आहे असाच खर्डा ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे खर्डा येथे तातडीने पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांन कडुन होत आहे.
याबाबत माहिती अशी की जामखेड तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खर्डा पोलीस दूरक्षेत्र हे फार वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु ऐन दिवाळीच्या काळात १७ नोव्हेंबर रोजी पहाटे एका अज्ञात इसमाने पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीत प्रवेश करून कार्यालयाचे कुलूप तोडून आतील खुर्च्या, टेबल व फर्निचरची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. दिवाळी असल्याकारणाने येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. या नंतर खर्डा येथील सकाळी फिरावयास जाणाऱ्या लोकांच्या ही बाब लक्षात आली. आनेक लोक जमल्याने या ठिकाणी एक इसम मोडतोड करत आसल्याचे आढळून आले. हा अज्ञात इसम मनोरुग्ण आसल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या ठीकाणी सदर इसमाचे नातेवाईक या ठिकाणी आले व त्यांनी या इसमास घेऊन गेले. ही माहिती खर्डा येथील पत्रकारांना समजली त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता कार्यालयातील वस्तूंची तोडफोड झाल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता तो माणूस मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही असे सांगितले. मात्र जनतेला न्याय देणाऱ्या कार्यालयाची तोडफोड होत असेल व त्या इसमावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे का, अशी भावना जनतेतून चर्चिली जात आहे.
खर्डा येथे आमदार रोहित पवार यांनी बऱ्याच वर्षापासून खर्डा पोलीस स्टेशनची प्रलंबित असणारी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केली आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर झाले आहे ते लवकरात लवकर सुरू करावे त्यामुळे येथील गुन्हेगारी व गुंडगिरी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा खर्डेकरांमधून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत