कोपरगाव(अक्षय काळे) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी ८ व्या स्मृतिदिना निम्मित कोपरगां...
कोपरगाव(अक्षय काळे)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी ८ व्या स्मृतिदिना निम्मित कोपरगांव शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेनाप्रमुख म्हणजे शिवतेज. मराठी माणसाच्या हृदयात अस्मितेचा अंगार आणि अवघ्या देशात हिंदुत्वाची मशाल चेतविणाऱ्या या शिवतेजाला वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींचा जनसागर उसळत असतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी आवाहन केले होते की आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या त्यामुळे आपल्या लाडक्या "साहेबांना" कोपरगावातील शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरेंच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले असे आमच्या साहेबांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या सहवासातील आठवणी ताज्या झाल्या. माझ्यासाठी शिवसेनाप्रमुख विठ्ठलच होते कारण प्रस्थापित राजकारण्यांना सत्ता असतांनही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नव्हता. अशा वेळी साहेबांचे विचार होते की,८०% समजाकरण व २०% राजकारण या पासून प्रेरणा घेऊन शिवसैनिकांना एकत्रित करून कामाला सुरुवात केली. हे करत असतांना प्रस्थापितांकडून मोठा विरोध होत होता. तरी काम सुरू होते. जे कार्यकर्ते शिवसेनेत काम करत होते, त्यांच्यावर दबाव वाढत होता. पण साहेबांच्या विचरातून नवी ऊर्जा मिळत होती. कोपरगांवकरांच्या पाणी,वीज,रस्ते विषयी समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका लक्ष देत नव्हती. त्यासाठी आंदोलने, मोर्चे काढावे लागले. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर कोपरगांव नगरपालिकेची जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली. साहेबांच्या आशीर्वादाने २००१ साली नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि कोपरगावात ३५ वर्षानंतर सत्ता पाळट होऊन जनतेतून प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मानही मिळाला. ज्यांच्या मुळे समाजात नाव,प्रातिष्ठा मिळाली, त्या देवाला भेटण्याची संधी ही मला मिळाली.
साहेबांचा हाथ माझ्या खांद्यावर पडला त्यावेळी खूप भारावून गेलो.आजही त्याच भेटीच्या आठवणी तशाच जाग्या आहेत.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,एस टी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे,सरपंच संजय गुरसळ,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी युवासेना सह सचिव सुनील तिवारी, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवानेते विक्रांत झावरे,अशोक लकारे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भूषण पाटणकर,गगन हाडा,आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते,दिलीप अरगडे, विभागप्रमुख रफिक शेख,जयेश हस्वाल,शैलेश वाघ,मयुर दळवी,किरण आडांगळे,किरण गायकवाड, सौरभ गायकवाड,रामदास शिंदे,विशाल झावरे,सचिन आसने,सलीमभाई, योगेश मोरे,लक्ष्मण मंजुळ,श्रीपाद भसाळे,राहुल शिंदे,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे,वाहतूकसेनेचे तालुकाप्रमुख पप्पू पेकळे,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्राट,शहरप्रमुख जाफर सय्यद, उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार,अविनाश वाघ,अशोक पवार,वैभव हलवाई,निशांत झावरे,किरण सूर्यवंशी,अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे,कल्पेश मंडलिक, अशोक लांडे,रितेश राऊत,दिपक दळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सूत्रसंचलन भरत मोरे यांनी केले तर आभार शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत