सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षित पणाने जनतेचे हाल- चोरगे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षित पणाने जनतेचे हाल- चोरगे

 कोपरगाव(वेबटीम) नगर मनमाड महामार्गावरून प्रवास म्हणजे जीवनाशी खेळ आहे .महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने नविच शोध लावलाय महामार्गा...

 कोपरगाव(वेबटीम)

नगर मनमाड महामार्गावरून प्रवास म्हणजे जीवनाशी खेळ आहे .महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने नविच शोध लावलाय महामार्गावर मुरूमाने खडे बुजवण्याचा  मुरूमाने खड्डे बुजवल्याने दुचाकी स्वराच्या डोळ्यात घाण जावुन अपघात होण्याची शक्यता अत्यंत वाढली असल्याचे किशोर चोरगे यांनी म्हंटले आहे.

    त्यात चारचाकी सहाचाकी दहाचाकी गाड्या या खड्डे वाचवण्या उद्देशाने वेगात असतांना अचानक ब्रेक लावता तसेच नंतर कासव गतीने चालता यामुळे मागुन येणारा वाहन चालक अचानक बिचकतो आणि आपला वेग आवरू पाहतो जर वेग आवरू शकला तर जगला नाही तर विना अडथळा यम सदनी पोहचला 

     या अपघाताने ना सरकारला सुतक पडत ना मंत्र्यांना ना सार्वजनिक बांधकाम विभागाला ना लोकप्रतिनिधींना पण पोटासाठी रोज शेकडो किलोमीटर ची  भटकंती करतांना जो अपघाताने मरतो त्याचा परिवार उध्वस्त होऊन देशोधडीला लागतो  पण आमच्या जनसेवकांना प्रशासनांना कशासाठी निवडुन दिल याच तार्तम्य न राहता ते या महत्वाच्या विषयावरून मिस्टर इंडिया होतात 

 हि शोकांतिका आहे लाखोने पगार घेणारे मंत्री संत्री लोकप्रतिनिधी यांना जनतेच्या प्रश्नाची कधी जाण होणार ते   एसी ऑफिस मध्ये  बसुन नक्कीच होणार नाही

     महामार्गावर मुरूम टाकुन एक दोन मीटर लांबी÷रूंदी = दिड दोन फुट खोल खड्डे बुंजवणे म्हणजे अजब दुनियाचा गजब प्रकारच कि यावरून प्रवास करतांनी डोळ्यात या मूरमाचा फुफुटा जाऊन अपघात झाल्यावर मृत्यु किंवा अपंगत्व आल्यावर जिवन कस नर्क होत हे एसी ऑफिस मध्ये बसुन जननायकांना कसे कळणार कार्यकर्त्यांनी पक्षाशी‌ एकनिष्ट राहण्यापेक्षा विकासाशी एकनिष्ट राहायला शिकाव जो नेता विकास करेन तोच आपला पक्ष संघटना आता सतरंज्या उचलन बंद कराव  तरच निरपराधांचे प्राण वाचेन रस्ते अपघातात मरणारा एकादा कार्यकर्ता हि असु शकतो या मरणाने कोणत्याच नेत्याला दूख अथवा सुतक पडत नाही तेव्हा आता झेंडे धरण बंद कराव तरच विकास शक्य आहे रस्त्याची हि गत फक्त नगर मनमाड महामार्गाची गाथा नाही हि अखंड महाराष्ट्राची कथा आहे  जागे व्हा जागे व्हाल तरच जगाल असे चोरगे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत