पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे राहुरीचे पोलीस कर्मचारी विशाल हापसे यांची आत्महत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे राहुरीचे पोलीस कर्मचारी विशाल हापसे यांची आत्महत्या

  राहूरी(वेबटीम)  पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावातून राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विशाल हापसे यांनी आत्महत्या केल्याचे विशा...

 राहूरी(वेबटीम)

 पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावातून राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विशाल हापसे यांनी आत्महत्या केल्याचे विशाल यांचे बंधू देवेंद्र हापसे यांनी राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी सोनाली व तिचा प्रियकर पोलीस नाईक विशाल खंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   विशाल राम हापसे( वय ३५ वर्ष राहणार मुळ गाव देहरे तालूका नगर) हे अहमदनगर पोलिस दलात कार्यरत होते. ते दोन अडिच महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथून बदली होऊन राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाले होते. राहुरी शहरातील डुबीचा मळा येथे भाडोत्री रूम घेऊन आपल्या कुटूंबासह राहत होते. तसेच पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत ते काम करत होते. दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान त्यांनी आपल्या घरातच विषारी औषध प्राशन केले. त्यापूर्वी ते आपल्या भावा बरोबर व्हिडिओ काॅल करून बोलले. काही वेळातच ते अत्यावस्थ होऊन बेशुद्ध पडले. काही लोकांनी घराचा दरवाजा तोडून त्यांना तातडीने लोणी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. त्यांचा अत्यंविधी दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दुपार दिड वाजे दरम्यान देहरे येथील स्मशानभूमीत करण्यात आला.


 दरम्यान विशाल हापसे यांनी पत्नी सोनाली हिचे पोलीस नाईक विशाल खंडागळे याच्या सोबत अनैतिक संबध होते. त्यात अडसर येत असल्याने विशाल हापसे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मानसिक तणावातून विशाल हापसे यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येस पत्नी सोनाली व प्रियकर खंडागळे हे दोघे जबाबदार असून त्याबाबतची तक्रार मयत विशाल यांचे बंधू देवेंद्र यांनी राहूरी पोलीस ठाण्यात दिली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत