कांदा पेरणी यंत्र बनविणाऱ्या देवळालीच्या तरुणांचा सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कांदा पेरणी यंत्र बनविणाऱ्या देवळालीच्या तरुणांचा सत्कार

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) कांदा उत्पादकांसाठी पेरणी यंत्र बनविणाऱ्या देवळाली प्रवरा येथील  प्रसाद देशमुख  सौरभ कदम या दोन तरुणांचा वैष्णवी चौ...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

कांदा उत्पादकांसाठी पेरणी यंत्र बनविणाऱ्या देवळाली प्रवरा येथील  प्रसाद देशमुख  सौरभ कदम या दोन तरुणांचा वैष्णवी चौक प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

प्रसाद देशमुख व सौरभ कदम या दोघांनी आपल्या संकल्पनेतून  कांदा उत्पादकांसाठी पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राबाबतची माहिती इतरांना मिळावी व दोघांनी जे यंत्र तयार केले आहे , त्याची प्रेरणा घेऊन आपले तरुण शेतकरी वर्गाने सुद्धा पुढाकार घ्यावा या उद्देशाने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने या दोन्ही तरुणांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम,सल्लागार अनिल येवले, संजय वाणी, संदीप कदम, डॉ घोलप, मनोज तांबे, बाबासाहेब खांदे, नितीन मोरे,अमोल कदम,मयूर मोरे, अमोल वाळुंज, गणेश रिंगे, सचिन तारडे,किसन वरखडे, अजय वाणी,अनिल वाणी, दुर्वेश वाणी,महेंद्र दोंड, ज्ञानेश्वर गागरे, अमोल मोरे, रोहित वाकचौरे व परिसरातील  शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत