कोपरगाव(वेबटीम) दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस केले जेरबंद, कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरानाजीक असलेल्या न...
कोपरगाव(वेबटीम)
दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस केले जेरबंद, कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरानाजीक असलेल्या नगर-मनमाड या राज्यमार्गावरील कातकडे पॆट्रोल पंपासमोर रात्री बाराच्यादरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळी सुमारास दारोड्याच्या तयारीत असलेले महेश भाऊसाहेब मंचरे (वय-२४) या सह तीन आरोपिंना कोपरगाव शहर पोलिसानी पकडले आहे . तर यातील एक आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना गुप्त बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, बेट नाका परिसर कटकडे पेट्रोल पंपा जवळ काही इसम स्कॉर्पिओ गाडी क्रमांक mh 23 as 7458 व FZ दुचाकी सह जमलेले असून ते दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यावरून१०.५० वाजेच्या सुमारास एक संशयित रित्या उभी असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली.त्यांनी आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे,रा.गोटुंबे आखाडा,ता.राहुरी, सुरज लक्ष्मण वडमारे, (वय-२२) रा.आहेर वायगाव ता.बीड,जि.गेवराई राहुल कुंडलिक बुधनव,(वय-२२) रा.खांमगाव ता.जि. बीड, गफूर गनिभाई बागवान रा.निंभारा मैदान,कोपरगाव आदींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे यावरील क्रमांकाची एक महिंद्रा स्कॉर्पिओ जीप एक एफ.झेड. दुचाकी (चेसी क्रमांक एम.१२ सी.जे.९ डी.२००६९७२) तर जीप गाडीत एक लोखंडी गज, एक लाकडी दांडके,एक गज,दोन कोयते,विवो कंपनीचे तीन भ्रमणध्वनी आदी ऐवज जप्त केला असून यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे (वय-२८) यांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भारत चितळकर,(पूर्ण नाव माहित नाही)रा.गुंथेगाव ता.गेवराई,जि. बीड हा फरार आहे.
शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८१६/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२ प्रमाणे वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.
वरील अटक झालेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. तर वरील अटक झालेल्या आरोपींमधील महेश मंचरे येरवडा कारागृहातून तसेच गफूर बागवान नाशिक कारागृहातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर सोडण्यात आले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत