देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव) कोरोना रुग्णांची सर्वत्र वाढ होत असताना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरात ७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आह...
देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव)
कोरोना रुग्णांची सर्वत्र वाढ होत असताना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरात ७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
देवळाली प्रवरात दिवाळीनंतर आठ दिवसांनी एकाच कुटुंबातील जवळपास ६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत.तर अन्य एका कुटुंबातील १ पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या दिवाळी नंतर वाढणार अशी शक्यता असतानाच देवळाली प्रवरात तब्बल ७ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकानी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली. विनामास्क फिरणारे असंख्य व्यक्ती बाजारतळावर रोज पहावयास मिळतात.त्यांनी पून्हा एकदा स्वयंशिस्त पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत