सोन्याच्या दुकानातुन ग्राहकाचे लाख रूपये पळवले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोन्याच्या दुकानातुन ग्राहकाचे लाख रूपये पळवले

जामखेड प्रतिनिधी भरदिवसा जामखेडच्या  मेनपेठेतील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानातुन एका महिला ग्राहकाची पैश्याची पिशवीच लंपास होण्याची  घटना र...

जामखेड प्रतिनिधी

भरदिवसा जामखेडच्या  मेनपेठेतील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानातुन एका महिला ग्राहकाची पैश्याची पिशवीच लंपास होण्याची  घटना रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे या घटनेत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे शहरातील मेनपेठेत चिंतामणी ज्वेलर्स हे प्रसिद्ध सोन्याचे दुकान आहे.  शनिवारी  उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदरूड (ता भूम)  येथील मंगल गिरी वय ४५ ह्या आपल्या मुलासमवेत भाऊबीजेनिमित्त आष्टी तालुक्यात जात असतानाच त्या जामखेडमध्ये सोने खरेदीसाठी चिंतामणी ज्वेलर्स या सराफ दुकानात गेल्या होत्या. यावेळी गिरी यांचा मुलगा मयुर गिरी हा सोने खरेदी करत आसताना मंगल गिरी ह्या दुकानातील सोफ्यावर पैश्याची पिशवी घेऊन बसल्या होत्या. काही वेळाने मयुर याने आपल्या आईला सोने पाहण्यासाठी काऊंटरजवळ बोलावले असता  मंगल गिरी ह्या गडबडीत सोफ्यावर पिशवी तशीच ठेऊन सोने पाहण्यासाठी काऊंटरजवळ गेल्या. मात्र त्यांनी बॅग पाहीली असता तिची चैन उघडी असलेली त्यांना दिसली. त्याच वेळी त्यांनी बॅग पाहीली असता बॅगेतील पैश्याची  पिशवी गायब असल्याचे त्यांना दिसले. दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन पैश्यावर डल्ला मारण्याची घटना उघडकीस येताच दुकानात मात्र मोठी खळबळ उडाली होती. 

 दरम्यान मंगल गिरी यांनी शनिवारी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या चोरीत मंगल गिरी यांची एक लाख रूपयांची रोकड चोरीस गेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड काँस्टेबल बाप्पूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत