कोपरगाव(वेबटीम) सध्या थंडीचे प्रमाण वाढत चाले असताना शहरातील शिवजागर फाऊंडेशनने गोर गरीब लोकांना उबदार स्वेटरचे वाटप केले. शिवजागर फाउंडेश...
कोपरगाव(वेबटीम)
सध्या थंडीचे प्रमाण वाढत चाले असताना शहरातील शिवजागर फाऊंडेशनने गोर गरीब लोकांना उबदार स्वेटरचे वाटप केले.
शिवजागर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोपरगाव एक हात मदतीचा थंडीचा वाढता प्रभाव बघून शिवजागर फाउंडेशन याच्या संकल्पने तुन एक आपलेपणाची भावना मनाशी बाळगून याच्या वतीने कोपरगावातील कानाकोपऱ्यातील गोर गरीब लोकांना ऊबदार स्वेटर वाटप करण्यात आले.
स्वेटर वाटताना ह्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून शिवजागरने समाधान व्यक्त केले.प्रथम शिवस्मारक येथे महा आरती घेऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसूत्र प्रतिष्ठान जेऊर कुंभारी यांच्या हातून सुरवात करण्यात आली .
यावेळी शिवजागरचे अजय सुपेकर, परेश सोनवणे,सुधाकर वक्ते, प्रदीप गायकवाड, अतिश शिंदे,अरुण सुपेकर, आशिष शिंदे,संतोष जाधव, मयूर चव्हाण, राहुल तळेकर, शुभम गवारे,प्रीतम सोनवणे, अनिकेत सताळे, आदी शिवभक्त मोठया प्रमाणात उपस्थितीत होते..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत