जामखेड(अविनाश बोधले) स्वच्छ सुंदर जामखेड करण्यासाठी सौ सुनंदाताई पवार यांच्या प्रोत्साहनाने जामखेड नगर परिषदेचे सी.ओ. मिनीनाथ दंडवते यांच्...
जामखेड(अविनाश बोधले)
स्वच्छ सुंदर जामखेड करण्यासाठी सौ सुनंदाताई पवार यांच्या प्रोत्साहनाने जामखेड नगर परिषदेचे सी.ओ. मिनीनाथ दंडवते यांच्या नियोजनाने जामखेड येथे एन.सी.सी.विभागाच्यावतीने स्वच्छता मोहीम ऐतिहासिक क्षेत्र श्री नागेश्वर मंदिर या ठिकाणापासून सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्री नागेश विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर ,ल.न होशिंगचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, नागेश विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ ढवळे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नागेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाबा खराडे, पर्यवेक्षक श्रीधर जगदाळे, प्रा रमेश बोलभट, बी.एस. शिंदे, रमेश अडसूळ ,भागवत सुपेकर, बोराटे,प्रकाश खंडागळे,अजय अवचरे उपस्थिती होते. एनसीसी ऑफिसर गौतम केळकर, अनिल देडे ,मयूर भोसले यांच्या नियोजनाखाली उपक्रम सुरू करण्यात आला.
या मोहिमेमध्ये स्वयंपुर्ती ने ग्रामस्थ,शिक्षक,कॅडेट सर्वांनीच श्रमदान करून नागेश्वर मंदिर परिसरातील अनावश्यक गवत, झाडेझुडपे, प्लॅस्टिक कचरा व सर्व स्वच्छता केली.रमेश अडसूळ व मुळे यांनी सर्वांना नाष्ट्याची व्यवस्था केली. जामखेड स्वच्छ करण्यासाठी यापुढेही नगरपरिषदेच्या सहकार्यासाठी स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभाग व योगदान केले जाईल असे एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
या उस्फुर्त स्वच्छता उपक्रमासाठी जामखेड तालुक्याचे तहसीलदार विशालजी नाईकवाडे यांनी सर्व टीमचे अभिनंदन करून कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत