कोपरगाव(वेबटीम) दिवाळीच्या सणामुळे कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज या मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी घाल...
कोपरगाव(वेबटीम)
दिवाळीच्या सणामुळे कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज या मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी घालावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,सध्या दिवाळीच्या सणाची गडबड सुरू आहे.या सणाच्या दरम्यान अनेक छोटे छोटे व्यावसायिक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज पर्यंत विविध दुकाने लावत असतात. मात्र या मुख्य रस्त्यावर त्यामुळे मोठी गर्दी असते .या पूर्वी नगर पालिकेने या व्यावसायिकांना अन्य ठिकाणी बसण्याची सक्ती केली होती. मात्र मुख्य बाजार पेठेतून अन्य ठिकाणी गिऱ्हाईक मिळत नाही. त्यामुळे हे छोटे छोटे व्यावसायिक याच ठिकाणी दुकाने लावत असतात मात्र या ठिकाणचा रस्ता वर्दळीचा असल्याने अनेक वाहनांची ये जा सुरू असते. तसेच अनेक उच्च शिक्षित व मोठे ग्राहक या परिसरात आपल्या चारचाकी गाड्या पार्किंग करून खरेदी करतात त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊन छोटे व नियमित दुकानदार यांना मोठी अडचण होते.
त्याच प्रमाणे किरकोळ अपघात देखील होतात. त्यामुळे निदान गर्दीच्या कालावधीत नगर पालिका व पोलीस प्रशासन यांनी या भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज या भागात मुख्य रस्त्यावर सणासुदीच्या कालावधीत मोठ्या चारचाकी गाड्या येणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य ये वाहतूक नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहक व्यापारी व चालक यांची अडचण दूर होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत