जामखेड येथे शहरात चोरटय़ांनी मारला १ लाखावर डल्ला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जामखेड येथे शहरात चोरटय़ांनी मारला १ लाखावर डल्ला

  जामखेड(अविनाश बोधले) गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आसुन मोरे वस्ती येथील चोरीची ताजी घटना असतानाच पुन्हा शहर...

 जामखेड(अविनाश बोधले)

गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आसुन मोरे वस्ती येथील चोरीची ताजी घटना असतानाच पुन्हा शहरातील तपनेश्वर गल्ली येथे चोरटय़ांनी घरावर डल्ला मारुन सोन्या चांदीसह एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.


सध्या दिवाळी सन हा जवळ आला आसल्याने चोरटय़ांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. शहरातील बीड रोड येथील दुकाने फोडून मोबाईल साहीत्य चोरुन नेले होते. यानंतर चोवीस तासात या चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र पुन्हा काही दिवसात मोरे वस्ती येथे चोरटय़ांनी मारहाण करून फिर्यादीच्या घरातील रोख रक्कम चोरुन नेली होती. या घटनेला पाच सहा दिवस होत नाही तोच तपनेश्वर गल्ली येथील फीर्यादी सुजित भास्कर वारे यांच्या घरात दि ९ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी केली. या चोरटय़ांनी रहात्या घराच्या हॉलचा दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सामानाची उचकापाचक करुन कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचा असा एकुण एक लाख रुपयांचा एवज चोरुन नेला. यानंतर घटनास्थळी पोलीसांनी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

 शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत आसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत