अकोले (वेबटीम) पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या संकल्पनेने केंद्र सरकारने दिव्यांगाना युनिक कार्ड देत असुन यातुन केंद्र सरकारने दिव्यांगाना ओ...
अकोले (वेबटीम)
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या संकल्पनेने केंद्र सरकारने दिव्यांगाना युनिक कार्ड देत असुन यातुन केंद्र सरकारने दिव्यांगाना ओळख निर्माण करुन दिली आहे असे प्रतिपादन माजी आ.वैभवराव पिचड यांनी केले.
अकोले तालुका पंचायत समिती कार्यालयात भारतीय जनता पार्टी दिव्यांग संघटना व मुकबधीर विद्यालय यांनी केद्र सरकारच्यावतिने दिव्यांग व्यक्तीना दिले जाणारे युनिक कार्ड (अैष्णीक कार्ड)वाटप माजी आमदार वैभवराव पिचड यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री कैलासराव वाकचाैरे, श्री जालिंदर वाकचाैरे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,पंचायत समिती सभापती साै.उर्मिला राऊत,उपसभापती श्री दत्ताञय देशमुख, पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर, नगरसेविका व भाजपा महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष साै.सोनाली नाईकवाडी, जिल्हाउपाध्यक्ष गिरजाजी जाधव,नगरसेवक सचिन शेटे,दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचाैरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पिचड म्हणाले कि केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे.आज केंद्र सरकारने प्रत्येक दिव्यांगाना स्वतंत्र अशी ओळख निर्माण करुन देण्याचा उपक्रम घेतला आहे.त्यानुसार आज ९० दिव्यांगाना युनिक कार्ड देण्यात येत आहे.ज्या लोकांची अद्याप कार्ड साठी कागदपत्र देणे बाकी आहे त्यानी लवकर द्यावी.तालुक्यातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न आपण मार्गी लावली असुन यापुढील काळातही दिव्यांगाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले .
यावेळी राहुल देशमुख, विजय पवार,मच्छिंद्र चाैधरी,सुशांत वाकचाैरे, संजय डोंगरे,बाळासाहेब धुमाळ,ऋषाली झोळेकर,पुष्पा दळवी,मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल डुबे,मच्छिंद्र पावसे, नानासाहेब दाभाडे,संतोष खताळ,रावसाहेब वाघमारे,शिवाजी शिंदे,सुयोग तोरकडी,आदि उपस्थित होते.
As if/7038505083
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा