कोपरगाव (अक्षय काळे) कोपरगाव शहराला लाभलेले पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचा आज जेष्ठ नागरिकाच्या उपस्तीतीत व शहरातील व्यावसाईक,सामान्य...
कोपरगाव (अक्षय काळे)
कोपरगाव शहराला लाभलेले पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचा आज जेष्ठ नागरिकाच्या उपस्तीतीत व शहरातील व्यावसाईक,सामान्य नागरिक,व सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या वतीने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कोपरगाव तालुक्याला आणि शहराला ज्यांनी आपल्या अनोख्या कार्यशैलीतून गुन्ह्गार प्रवृत्तीच्या लोकानमध्ये एकप्रकारचा वचक बसविला ,बेशिस्त लोकांना कायद्याच्या चौकटीत बसून सबब दिला.शहरातील नागरिक हे कसे सुरक्षित राहतील या कडे त्यांनी सर्वात जास्त लक्ष दिले.
ज्या वेळी शहरावर प्रसंग ओढावले तेव्हा तेव्हा त्यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमनी क्षणाचा विलंब न करता समोर उभे राहिले.जेव्हा कोपरगाव शहरात पूरपरिस्थिती ओढवली होती तेव्हा त्यांच्याच निदर्शानाखाली बचाव मोहीम राबून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचून मोठी जीवित हानी वाचवली.
करोना सारखी मोठी महामारीने जगभरात थैमान घातले असून राज्यापासून ते गाव पातळीवर झपाट्याने करोना रुग्ण संख्या वाढू लागली त्यात कोपरगाव तालुक्यात हि रुग्ण संख्या हि चिंताजन वाढत होती.परंतु पो.नि. माणगावकर यांच्या कडक पावलांनी आज कोपरगाव तालुक्याची रुग्ण संख्या हि आटोक्यात आलेली दिसते आहे.त्यात त्यांचा खारीचा वाटा आहे.त्यांच्या कडक नियमावली मुळेच हे शक्य झाले नाहीतर याला आला घालणे अशक्य होते. कोपरगाव शहराला सुधरवण्यासाठी असेच सिंघम पोलीस अधिकारी असणे गरजेचे आहे आणि पुढील काळात हि असले पाहिजे असे नागरिक आणि व्यापरी यांच्यात चर्चेला केली जात आहे.कार्यक्रमाच्या प्रसंगी पो.नि.राकेश माणगावकर यांनी सर्वांचे आभार वेक्त केली आपले मनोगत वेक्त केले ते म्हणले कि मी या शहरात सव्वा दोन वर्ष काम केले आणि आज माझा निरोप समारंभा आपण सर्वांनी मिळून आयोजित केला एक प्रकारची माझ्या कामाची पोहोच पावती मला मिळाली असे मी मानतो. पुढे ते बोले ‘ ना किसीसे डरना ना किसी गरीब पे अन्यान करणा ‘ असा गुरु मंत्र माझे वरिष्ठ यांनी मला दिला आणि त्याच प्रमाणे मी काम केले आणि या पुढे देखील मी असेच काम करत राहणार माझी बदली कुठे हि होऊ कुणाला माझी गरज भासली तर मला कधी हि संपर्क करा त्याचा प्रश्न मी मार्गी लावेल असे कार्यक्रमात बोलताना ते म्हंटले.
त्याचबरोबर जेष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा आपले मनोगत वेक्त केले असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुशांत घोडके यांनी केले असून त्यात जेष्ठ नागरिक कैलासजी ठोळ,को.न.पा.उप नगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,अ.जा.जमाती.जिल्हा अध्यक्ष भाजपा -विनोद राक्षे , गोदामाई प्रतिष्ठान – आदिनाथ ठाकणे ,शिवसेना शहरप्रमुख – कालविंदरसिंग दडीयाल,विद्यार्थी सेना चेरमन – हिरालाल महानुभाव,मा.उप.नगराध्यक्ष – योगेश बागुल यांनी आपले मनोगत वेक्त केले.आदि मान्यवर यांच्या उपस्तीतीत निरोप समारंभ पार पडला असून कोपरगाव शहराला नवीन पोलीस निरीक्षक कोण येणार याकडे सर्व नागरिकाचे लक्षलागून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत