साई आधार प्रतिष्ठाच्यावतीने महिलांना व्यासपीठ- सौ.कोल्हे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई आधार प्रतिष्ठाच्यावतीने महिलांना व्यासपीठ- सौ.कोल्हे

पोहेगाव(वेबटीम) माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपल...

पोहेगाव(वेबटीम)

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्येही खूप काही कला दडलेल्या आहेत त्या विकसित करणे महत्त्वाचे आहे. रांगोळी स्पर्धा घेऊन तालुक्यातील चांदेकसारे येथे साई आधार बहुउद्देशीय संस्थेने मुली व महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले आहे.असे प्रतिपादन संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांनी केले.

कोपरगाव  तालुक्यातील चांदेकसारे येथे चांदेकसारे येथे साई आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष केशवराव होन यांनी महिलांसाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. महिला सक्षम बनविण्याचा उद्देश संस्थेचा असे सांगितले.

यावेळी सौ मोनिकाताई संधान, साईआधार संस्थेचे संस्थापक केशवराव होन, संचालक संजय होन, सरपंच विजय होन ,चंचल होन,संस्थेचे संचालक राजेंद्र होन, मुकुंद होन,व्ही टी होन, शांताबाई होन, सुलोचना होन, चंचल होन ,सुनिता होन ,मिराताई होन, सीमाताई पवार, भारतीय जनता पार्टीच्या योगिता होन,किरण होन,अभिजीत झगडे ,राहुल होन, मधुकर खरात ,अर्जुन होन, कांतीलाल होन, भाऊसाहेब होन,रावसाहेब होन,धीरज बोरावके, संजय विघे, प्रल्हाद होन, मलु होन, स्पर्धेचे परीक्षक प्रा गणेश सपकाळ, संतोष तांदळे, उमाकांत भांबरे, शोभाताई दिघे रेश्मा आव्हाड अदी सह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.स्पर्धेत दोन गट तयार केले होते वय वर्ष 5 ते15 व वय वर्ष 16 ते त्यापुढील महिलांना यात सहभाग होता . टिपक्यांची, संस्कार भारती, निसर्गचित्र ,व्यक्तिचित्र या प्रकारात रांगोळी काढून 105 महिलांनी आपली कला सादर केली. 


या स्पर्धे अ गटातील भक्ती शिवाजी होन , श्रुती विजय खरात, साक्षी अभिजीत झगडे, आरजु सरदार सय्यद, आदित्य चंद्रकांत होन या विजेत्या स्पर्धकांना दहा ग्रॅम चांदीचे नाणे व उपविजेत्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पाच ग्रॅम चांदीचे नाणे यासह प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले.तर ब गटातील मोनाली रोहिदास होन, अश्विनी शांताराम खरात ,प्रियांका प्रेम होन, पल्लवी कुणाल तुवर, रूपाली अभिजीत आहेर ,अनिता शशिकांत पाटील, कीर्ती विलास होन या विजेत्या महिलांना पैठणी ,दहा ग्रॅम चांदीचे नाणे ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व उपविजेत्या महिलांना उत्तेजनार्थ पाच ग्रॅम चांदीचे नाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक सौ रेणुकाताई कोल्हे व मोनालीताई संधान यांच्या हस्ते देण्यात देऊन गौरवण्यात आले.सूत्रसंचालन सौ शोभाताई दिघे यांनी केले तर आभार उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष विजय होन यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत