कष्टकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर काढावी लागली... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कष्टकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर काढावी लागली...

   अकोले(वेबटीम) अनितीने आलेले  राज्यातले या तिन तिघाडी, काम बिघाडी सरकारमुळे शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसाला  दिवाळी रस्त्यावर काढावी लाग...

  अकोले(वेबटीम)

अनितीने आलेले  राज्यातले या तिन तिघाडी, काम बिघाडी सरकारमुळे शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसाला  दिवाळी रस्त्यावर काढावी लागली.रस्त्यावर उतरूण आंदोलन व  विजबीलाची होळी करण्याची वेळ आली असल्याची टिका माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.

       महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वतिने दिलेल्या वाढीव वीजबीलासंदर्भात राज्य सरकारचा निषेध करुन वीज बीलाची होळी व तालुक्यात अतिवृष्टी होऊनही अत्यल्प मदत मिळाल्याने तालुक्याचे निष्क्रिय आमदाराचा निषेध मोर्चा भारतीय जनता पार्टीचे वतिने आज काढण्यात आला.यावेळी महावितरणच्या अकोले कार्यालयासमोर वीजबीलांची होळी करण्यात आली.यावेळी जि.प.गटनेते जालिंदर वाकचाैरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,यशवंतराव आभाळे,ॲड.वसंतराव मनकर,गिरजाजी जाधव,भाजपा महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष साै.सोनालीताई नाईकवाडी,अशोक देशमुख,भाऊ पा नवले, पं.स.सभापती साै.उर्मिला राऊत,नगराध्यक्षा साै.सगिता शेटे,उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,आदि प्रमुख उपस्थित होते.

सकाळी पक्ष कार्यालयापासुन  घोषणा देत निषेध  मोर्चा निघाला. यावेळी मोर्चामध्ये सामिल गोंधळीने गोंधळ गात राज्य सरकार व तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यावर मार्मिक  टीका केली.यानंतर मोर्चा अकोले महावितरणच्या कार्यालयात गेला तेथे

मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर माजी आ.वैभवराव पिचड बोलत होते.

  यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले कि राज्यात गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाचा संकटकाळ सुरु आहे यामुळे शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक सर्वांचाच रोजगार हिरावला गेला सर्व जण संकटात असताना सण उत्सव कसा साजरा करावा याचिंतेत असताना वीज मंडळाने प्रत्येकाला वाढीव वीजबील दिले. दिपावली पूर्वी राज्याचे वीज मंञ्यानी शेतकऱ्यांसह सर्वाना सवलत देवून सर्वाची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन दिले माञ तसे काही न होता उलट या सुलतानी सरकारने वाढीव बील भरण्याचे फर्माण काढले.काहीही झाले तरी ५० टक्के तरी बील भरा असे फर्माण काढले. जनतेचा अपेक्षाभंग केला.गोरगरीब सामान्य माणसाला अव्वाच्या सव्वा बील दिली आहे.एैपती पेक्षा जास्तीचे बील आल्याने त्यांनी उपजीविका करावी की वीज बील भरावे असा प्रश्न त्यांचेसमोर उभा राहीला.तरी या सरकारने आता कसलेहि निकष न लावता सरसकट सर्वाना संपूर्ण वीज बील माफ करावे. आता तालुक्यातील एकही शेतकरी  वीज बील भरणार नाही.तसेच जर वीजबील भरले नाही म्हणून कोणी वीज कनेक्शन तोडण्यास आले तर याद राखा असा इशाराही दिला.शेतकऱ्यांना राञीचे लाईटचे शेड्यूल बदलून दिवसा लाईट दिली पाहिजे.तसेच तालुक्यातील आपल्या काळातील मंजूर कुंभेफळ व इतर सप्टेशनची कामे  जलद गतीने पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राजुरचे उपसरपंच गोकुळ कानकाटे,संतोष बनसोडे,राहुल देशमुख, अरुण शेळके,शंभू नेहे ,विजय लहामगे, नगरसेवक सचिन शेटे,परशराम शेळके,प्रकाश नाईकवाडी,साै.शारदाताई गायकर, पं.स.उपसभापती दत्ताञय देशमुख,सुशांत वाकचाैरे, हितेश कुंभार,राकेश कुंभकर्ण,रेश्मा गोडसे,बाळासाहेब नवले,नामदेव विसाळ,गोरख पथवे,नाजिम शेख,उबेद शेख,कविराज भांगरे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत