मातृ गौरव सोहळा प्रेरणादायी-गणेश दादा भांड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मातृ गौरव सोहळा प्रेरणादायी-गणेश दादा भांड

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) धकाधकीच्या जीवनात आजची तरूणाई जन्मदात्या आई-वडिलांना विसरुन जात असल्याचे दुर्देवी चित्र पहावयास मिळत असून नवीन पिढीला...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

धकाधकीच्या जीवनात आजची तरूणाई जन्मदात्या आई-वडिलांना विसरुन जात असल्याचे दुर्देवी चित्र पहावयास मिळत असून नवीन पिढीला दिशा मिळावी यासाठी  प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाने केलेला मातृ गौरव सोहळा प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांनी केले.

 राहूरी फॅक्टरी येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या नवीन वास्तूचा कलश पूजन सोहळा व मातृ गौरव सोहळा गुरुवारी संपन्न झाला.प्रसंगी श्री. भांड बोलत होते. या कार्यक्रमास पुणे झोनच्या राजयोगीनी ब्रम्हाकुमारी सुनंदा दीदी, आदर्श पतसंसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी विमल मोरे, रंजना पवार, सुनीता सांबारे यांचा मातृ गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ब्रम्हाकुमारी नलिनी दीदी, ब्रम्हाकुमारी उषा दीदी,ब्रम्हाकुमार दशरथ भाई, ब्रम्हाकुमारी शोभा दीदी, राहूरी फॅक्टरी सेंटरच्या ब्रम्हाकुमारी ज्योती दीदी उपस्थित होते.


 कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्रम्हाकुमार गणेश भाई, रामभाऊ येवले, किशोर निर्मळ, बाळासाहेब भांड, कुंदन बोरकर, श्री.राऊत, बबन डोंगरे, शरद मोरे आदींसह भाविकांनी परिश्रम घेतले. आभार ज्योती दीदी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत