व्यक्तीद्वेषाने दृष्टीहीन झालेल्यांची नजर शहरातील विकासापर्यत कशी पोहचणार - उपनगराध्यक्ष निखाडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

व्यक्तीद्वेषाने दृष्टीहीन झालेल्यांची नजर शहरातील विकासापर्यत कशी पोहचणार - उपनगराध्यक्ष निखाडे

  कोपरगाव(वेबटीम) माजी आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी शहरासाठी आणलेल्या निधीतील कामे शहरातील जनतेला माहित असुन अनेक विकासाची कामे प्...

 कोपरगाव(वेबटीम)

माजी आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी शहरासाठी आणलेल्या निधीतील कामे शहरातील जनतेला माहित असुन अनेक विकासाची कामे प्रगतीपथावर आहे. हे सर्वश्रुत असतांना जे व्यक्तीद्वेषाने दृष्टीहीन झाले त्यांना शहरातील विकास काय दिसणार ? अशी टीका कोपरगाव नगरपरिपदेचे उपगनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली.

प्रभाग क्रमांक १० मधील रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून सुमारे १० लाखाचा निधी मंजुर केला, या प्रभागातील नागरीकांनी मला निवडुन दिल्याने त्या प्रभागातील कामे करण्याचे माझे कर्तव्य आहे, आणि जनतेच्या सेवेत राहण्याची कोल्हे परिवाराची आम्हांला शिकवण असल्याने कामे करून घेण्याची माझी जबाबदारी आहे. असे असतांना मला नगरसेवक म्हणून निवडून देतांना येथील नागरीकांनी नगराध्यक्षांनाही मते दिलेली आहे, परंतु प्रभागातील आमचे सुज्ञ मित्र ते विसरून आमच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहे. त्यांनीही नगरपालिका निवडणुकीत मतदारांकडे जाउन नगराध्यक्षांना मते मागितली त्यांनी येथील गटारी तुंबल्या, डासांचे साम्राज्य वाढले यासाठी नगराध्यक्षांकडे काय पाठपुरावा केला हे सांगावे. तसेच पोपटपंची करून तोंडसुख घेतांना हे विचारात घ्यावे की, येथील नागरीकांच्या समस्येला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. याचा विसर पडु देउ नये.

 या भागात केलेल्या रस्त्याच्या कामाची खडी १५ दिवसात उघडी पडल्याचे आपण तावातावाने सांगतात, परंतु मी या सुज्ञ नागरीकांला सांगु इच्छितो की, या रस्त्याचे काम देतांना नगरपालिकेने दिले, ठेकेदार नगरपालिकेने नेमला, मग नगरसेवकाचा संबध कुठे आला. नागरीकांनी काम निकृष्ट असल्याच्या तक्रीरी केल्यावर कोणी पत्रप्रपंच केला, नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभुल केली. आणि जनतेच्या डोळयात धुळफेक करून रस्त्याचे काम पुर्ण करून घेतले. म्हणजे नगरपालिकेने केलेल्या कामाची खडी १५ दिवसात उघडी पडली, हेच आपण जनतेला सांगत आहात. हीच आपली कामाची पध्दत का. हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. परंतु आपण काय करणार आपण व्यक्तीद्वेषाने दृष्टीहीन झालात, आपली नजर शहरातील विकासावर कषी पोहचणार, असेही श्री निखाडे म्हणाले.

1 टिप्पणी

  1. कोपरगांव शहराचं काही खरं नाही,कुरघोडी राजकारणामुळे शहर भिकेला लागलं पण ...शब्द वेळेवरच वापरेन

    उत्तर द्याहटवा