अहमदनगर(वेबटीम)- गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याची माहिती अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल...
अहमदनगर(वेबटीम)-
गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याची माहिती अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांचा शनिवारी रात्री अहमदनगर येथील त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता.
या घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
दरम्यान गौरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा अहवाल प्राप्त झाला असून गळफास घेतल्याने गौरी गडाख यांचा मृत्य झाला असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू १३५/२०२० प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे श्री.अग्रवाल यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत