राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथिल साई आदर्श मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे कामकाज देशातील अग्रगण्य असलेल्या मल्टि नॅशनल कंपनी सारखे काटेकोर व...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथिल साई आदर्श मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे कामकाज देशातील अग्रगण्य असलेल्या मल्टि नॅशनल कंपनी सारखे काटेकोर व अद्यावत असल्यानेच अल्प काळात साई आदर्शचा वटवृक्ष झाला आहे अशी भावना खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.
साई आदर्श मल्टिस्टेटच्या आधार कार्ड पेमेंट,क्यु आर कोड व एटीएम सेवांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,अशोकराव थोरे, प्रा.दत्तात्रय वाणी,मेजर राजेंद्र कडू,सुनील कराळे,विजय गव्हाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी प्रास्ताविका मध्ये संस्थेच्या सात वर्षाचे काळात झालेल्या प्रगती चा लेख जोखा मांडला.संस्थेने सात वर्षात अठरा शाखा व नव्वद कोटी हुन अधिक ठेवी चा टप्पा ओलांडला असून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच सामाजिक बांधीलकी ची जाण ठेऊन विविध कामामध्ये पुढाकार घेतला आहे, संस्थेला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.संस्थेच्या आजपर्यंत च्या प्रगतीमध्ये संचालक,ठेवीदार,सभासद,ग्राहक व कर्मचारी यांचा मोठा वाटा असल्याचे कपाळे यांनी स्पष्ट केले.
खासदार लोखंडे यावेळी म्हणाले की नगर जिल्ह्यातील पतसंस्था हा शेतकऱ्यांचा खरा आधार आहे. तातडीची गरज,संकटात मदतीचा हात पतसंस्थाच देऊ शकतात. सहकारी तत्वावरील कोणतीही संस्था आपली संस्था आहे ही भावना ठेऊन चालवली तरच ती टिकते.आजकाल सहकारी साखर कारखाना बंद होतो मात्र तोच कारखाना खासगी म्हणून चालवला तर तीन वर्षात नफ्यात येतो. पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थानी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाविष्ट करण्याचे आवाहन करतांना यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध सेवा सुविधाचा शुभारंभ करण्यात आला व संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनस वाटप करण्यात आले.
प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे,बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलचे अध्यक्ष दत्तात्रय वाणी, शिवसेना नेते अशोकमामा थोरे,फंड पे कंपनी चे सोमनाथ राऊत,संचालक डॉ.विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या वतीने मान्यवर व जेष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विष्णुपंत गीते,बाळासाहेब तांबे,सुरेश थोरात, रामपाल पांडे,चांगदेव पवळे, आबासाहेब वाळुंज,अन्सार शेख, दीपक गांधी,रमेश चोरडिया, रामदास गरड,वेदांत कपाळे, धीरज कपाळे,अक्षय कपाळे, अनील वाघमारे, मॅनेजर सचिन खडके,शाखाधिकारी याकूब शेख आदींसह सभासद,ग्राहक,कर्मचारी उपस्थित होते.रफीक शेख यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर थोरात यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत