श्रीरामपुर शहरातील जुगार अड्ड्यावर छापा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपुर शहरातील जुगार अड्ड्यावर छापा

  श्रीरामपूर(वेबटीम)  श्रीरामपूर विभागाचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक  संदिप मिटके व  पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांच्या पथकाने जुगार अड्ड्याव...

 श्रीरामपूर(वेबटीम)


 श्रीरामपूर विभागाचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक  संदिप मिटके व  पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल सव्वा दोन लाखाचा मुद्देमालासह ६ जणांना अटक केली आहे.

 ९ नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर पोलिसांना श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरातील  जुगार अड्डा चालू आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक  दिपाली काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार डिवायएसपी संदिप मिटके, प्रशिक्षणार्थीं पोलीस निरीक्षक श्री.नोपाणी   यांच्या पथकाने सदरच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अनुप लोढा, सागर धुमाळ, सुनील भांड, निलेश कत्रोड, विजय हतांगळे, लक्ष्मण मोरे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्याने आलेले डीवायएसपी संदीप मिटके व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी  श्रीरामपूर येथील पदभार स्विकारल्यापासुन श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंदयांवर होत असलेल्या कारवाईमुळे  सर्वांचे धाबे दणालले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचव समाजातील सर्व घटकांतून कौतुक होत आहे.

1 टिप्पणी