स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानाचा पहिला हप्ता झाला वर्ग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानाचा पहिला हप्ता झाला वर्ग

  जामखेड(अविनाश बोधले )    १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार non- million plus cities अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरीता...

 जामखेड(अविनाश बोधले)


   १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार non- million plus cities अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरीता सन २०२०-२१ वर्षातील पिण्याचे पाणी(पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापरासह)व घनकचरा व्यवस्थापन या बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता केंद्रशासनाकडून मिळालेला नव्हता.कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी देखील अनेक अडचणी येत होत्या. हे अनुदान नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेत मिळावे या करता राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांकडुन पाठपुरावा करण्यात आला.आता या पाठपुराव्याला यश आले आहे.


  दि.१० नोव्हेंबरच्या शासन निर्णयाने राज्यातील 'ड' वर्ग महानगरपालिका, नगरपालिका,नगरपंचायत,नगरपरिषद आदी नागरी स्वराज्य संस्था करता तब्बल ३०५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्याकरता मान्यता देण्यात आली आहे.नगर जिल्ह्यातील तसेच आ. रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेड नगर परिषदेसाठी ८३ लक्ष ४३ हजार तर कर्जत नगर पंचायतीसाठी ४६ लक्ष ६६ हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे.नागरी स्वराज्य संस्थांना हा निधी वितरित करण्यासाठी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असुन ज्या-त्या स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम आर.टी.जीएसद्वारे तात्काळ वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जाते.आता हे अनुदान मिळाल्याने याचा ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना व्यवस्थापणासाठी खर्च करता येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेसाठी होईल फायदा- आ. रोहित पवार

       कर्जत आणि जामखेड शहर हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत मोठ्या ताकदीने उतरले आहे.दोन्ही शहरांच्या स्वच्छतेसाठी सर्वांनीच आता कंबर कसली असुन ही शहरे चकाचक होत आहेत आणि स्पर्धेतही चांगला क्रमांक पटकावतील अशी आशा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळालेल्या या अनुदानाचा स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेसाठी नक्कीच फायदा होईल.

1 टिप्पणी