जामखेड (वेबटीम) तालुक्यातील देवदैठण परिसरात असलेल्या शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महीलेवर अत्याचार करण्यात आला. या प्र...
जामखेड (वेबटीम)
तालुक्यातील देवदैठण परिसरात असलेल्या शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महीलेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी गावातीलच एक व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनाकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे २१ वर्षीय पिडीत महीलेवर आठ महीन्यांपूर्वी व त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर आरोपी भागवत धोंडीबा वाघमारे रा. देवदैठण याने अत्याचार केला. पिडीत महीला ही आपल्या देवदैठण येथील शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली आसता वरील आरोपी याने तीच्या जवळ जाऊन तीच्या इच्छे विरोधात जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतर पुन्हा चार पाच दिवसानंतर पिडीत महीला ही शेतात गुरे चारत आसताना आरोपीने पुन्हा तिच्या इच्छे विरोधात अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या घरच्यासंह तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. या नंतर फीर्यादी पिडीत महीलेने स्वतः जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत