शिक्षक बँकेतील गैरकारभाराची चौकशी करा ; रोहकले प्रणित गुरूमाऊली मंडळ करणार घंटानाद आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षक बँकेतील गैरकारभाराची चौकशी करा ; रोहकले प्रणित गुरूमाऊली मंडळ करणार घंटानाद आंदोलन

अहमदनगर : वेबटीम      अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने शताब्दी भेटीच्या नावाखाली खरेदी केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारा...

अहमदनगर : वेबटीम     


अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने शताब्दी भेटीच्या नावाखाली खरेदी केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाली असून त्या व्यवहाराच्या चौकशीकरिता व घड्याळ खरेदी व्यवहाराची कागदपत्रे मिळावीत याकरिता वेळोवेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ३२ अन्वये  बँकेकडे आणि उपनिबंधक कार्यालयाकडेही पत्रव्यवहार केलेला होता.  उपनिबंधक कार्यालयाने सुद्धा मुळ कागदपत्रे सभासदास देणेचे लेखी आदेश शिक्षक बँकेला बजावलेले होते. मात्र हेकेखोर सत्तारूढ मंडळाने उपनिबंधक कार्यालयाच्या लेखी आदेशालाही केराची टोपली दाखवून  न्यायालयीन प्रक्रिया सुरु असलेचे खोटे कारण देऊन उपनिबंधक कार्यालयाची दिशाभूल व अवमान केलेला आहे 

   


घड्याळ खरेदी करताना बँकेच्या संचालक मंडळाने आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने अत्यंत नियोजनपूर्वक अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यवहार केलेला आहे.  ह्या व्यवहारात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, अनियमितता आणि अपहार झालेला आहे असे प्रथमदर्शनी दिसते. वेळोवेळी पाठपुरावा करूनही ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे धादांत खोटे कारण देत  कागदपत्रे देणेबाबत उपनिबंधक कार्यालयाने शिक्षक बँकेला दोन वेळा लेखी आदेश देऊनही टाळाटाळ आणि दिरंगाई केली आहे. ज्यामुळे मा उपनिबंधक कार्यालयाच्या लेखी आदेशांचा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ३२ चा जाणीवपूर्वक अवमान झाला असून ह्यातून आर्थिक गैरव्यवहाराचा संशय बळावत आहे.

      त्याबरोबरच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अन्वये  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक लि. अहमदनगर ह्या संस्थेच्या माहे एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० अखेर पर्यंतच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत उपनिबंधक कार्यालयाच्या स्तरावरून कार्यवाही करणेस विनंती करण्याबाबतचे अर्ज  गणेश वाघ यांनी मा. अनिल कवडे साहेब, सहकार आयुक्त, महाराष्ट्र शासन यांना दि.१६ आॉक्टेबर २०२० रोजी समक्ष भेट घेऊन सादर केलेला आहे. सदर अर्ज मा.सहकार आयुक्त साहेब यांचेकडून उपनिबंधक कार्यालयाकडे  पुढील कार्यवाहीकरिता पाठवलेला असूनही    उपनिबंधक कार्यालयाकडून त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत आणि मागणीबाबत अद्याप शिक्षक बँकेशी पत्रव्यवहार तसेच योग्य कार्यवाही केली गेलेली नाही.

सातत्याने पत्रव्यवहार करून आणि पाठपुरावा करूनही सभासदांच्या मागण्या मान्य होत नसल्या कारणाने बँकेच्या सभासदांच्या वतीने उपनिबंधक कार्यालयासमोर बँक  अर्जदार मंगळवार दि २२ डिसेंबर रोजी कोविड १९ चे तसेच शासन नियमांचे पालन करून  घंटानाद आंदोलन करणार करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे विकास डावखरे,संजय शेळके,प्रवीण ठुबे, राजू थोरात,गणेश वाघ, संजय शिंदे,कारभारी खामकर,संतोष निमसे,बाळासाहेब वाबळे,सुहाग साबळे आदींनी दिली आहे.     

 उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशांचा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ३२ चा जाणीवपूर्वक अवमान करणाऱ्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर तातडीने कारवाई करावी तसेच मागणी केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती मिळाव्यात त्याचबरोबरअहमदनगर जिल्हा प्राथ.शिक्षक सह. बँकेच्या  यांचे माहे एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० अखेर पर्यंतच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत फेरहिशोब तपासणी करण्याचे आदेश पारीत करावेत.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशी करून आर्थीक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चिती व्हावी. संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी प्राधिकारी यांची रचना करून त्यास मान्यता दयावी अन्यथा डिडिआर कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार येईल.

 विकास डावखरे

जिल्हाध्यक्ष, गुरूमाऊली मंडळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत