कोपरगाव(अक्षय काळे) तालुक्यातील चांदेकसारे येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत पाडून दोन वर्षे झाली तरीही पाडलेल्या अर्धवट इमारतीच दवाखाना सु...
कोपरगाव(अक्षय काळे)
तालुक्यातील चांदेकसारे येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत पाडून दोन वर्षे झाली तरीही पाडलेल्या अर्धवट इमारतीच दवाखाना सुरू आहे त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे. लवकरात लवकर उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सुनील होन यांनी केली आहे.
यामुळे निवासी डॉक्टर येथे मुक्कामी थांबत नाही.रात्रीच्या वेळी जर कोनी आजारी पडले किंवा एखादी महीला बाळंतपणासाठी अडली तर तिला कोनताही आधार नाही, तसेच इमारतीची अवस्था ही अक्षरशा: भग्नावस्थेत आहे .
त्यामुळे या इमारतीच्या परिसरात अवैध धंदे करणारे लोकांचा वावर जास्तच वाढत असल्याचे दिसून येत आहे,उपचार मिळत नाही त्यामुळे गायत्री कंपनीचे हजारो कर्मचारी व चांदेकसारे परिसरात ऊस तोडणी कामगार आलेले असुन त्यानां जर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर त्यानी कुठे जायचे हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच उपकेंद्राच्या परिसरात गायत्री कंपनी चे अवजड वाहने सध्या उभे करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे की नाही असे दिसते .
चांदेकसारे उपकेंद्रासाठी एक निवासी डॉक्टर व परिचारिका असावी. तब्बल दोन वर्ष ईमारत पाडुन झाले तरीही प्रशासन याची दखल घेताना दिसत नाही .कोरोना संसर्गा च्या काळात रुग्णांचे खुप हाल झाले . उपकेंद्रातील डॉक्टर ,नर्स ,आशा सेविका यांनी जिवाची पर्वा न करता रुग्न वाढ होवुन दिली नाही.
त्या अनुशंगाने आ. आशुतोष दादा काळे मित्र मंडळ यांच्या कडून काही दिवसांपूर्वी पी पी ई किट चे वाटप ही करण्यात आले होते.
पंरतु आज महाराष्ट्रात करोनाचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याचे दिसून येते आहे, त्या करीता लवकरात लवकर उपकेंद्र ची प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधीत यंत्रनेणे उपकेंद्राची नविन जागा लवकर निश्चित करुन इमारत बांधकाम करावे अशी मागणी सागर होन यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत