राहूरी(वेबटीम) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाला जन्म दिला त्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो. त्यांनी प्र...
राहूरी(वेबटीम)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाला जन्म दिला त्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो. त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे प्रतिपादन आरडगावचे लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव यांनी केले.
राहूरी तालुक्यातील आरडगाव येथे आज दि ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जाधव बोलत होते.
यावेळी उपसरपंच सहादू भाऊ झुगे,तुकाराम आढाव,शिवाजी झुगे,दत्तात्रय म्हसे,संदिप जेऊघाले दत्तात्रय म्हसे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत